चंद्रपुर ;- चंद्रपूर जिल्हयात दुचाकी वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणाच्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-१९८८ कलम १२९ अन्वये सक्तीचे आहे. चंद्रपूर जिल्हयात जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत दुचाकीचे एकुन ३५० अपघात झाले असुन त्यात १९७ नागरिकांचा मृत्यु झाला आहे त्यापैकी १४४ दुचाकी स्वार गंभिर जखमी झाले आहेत..
तरी चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवर कडक कार्यवाही करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे सदर आदेशाची अंमलबजावणी सोमवार दि. १७/०१/२०२२ पासून सुरू करण्यात येईल सर्वप्रथम पोलीस विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यानंतर इतर विभागातील सरकारी अधिकारी व कर्मचारी व त्यानंतर सामान्य जनता अशी टप्याटप्याने कार्यवाही करण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरीकांनी यापुढे दुचाकी चालवितांना हेल्मेट परीधान करावे. चंद्रपूर जिल्हयातील वाढते अपघाताचे प्रमाण पाहता सर्व वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे व दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा याबाबत जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन पोलीस निरीक्षक श्री प्रविणकुमार पाटील यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment