Ads

शेतात विद्युत तांराना जिवंत प्रवाह सोडुन 3 चितळाची शिकार प्रकरणी एकास अटक

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील कवडु महादेव बोंढे वय 50 वर्ष धंदा शेती यांनी आपल्या शेत सर्व्हे नं 152 दि.30/12/2021 रात्रौ.विद्युत तांराना जिवंत प्रवाह सोडुन त्याद्वारे 3 चितळाची chitalsचंद्रपुर शिकार करण्यात आले. पैकी 2 चितळ मृत वअपूर्ण अवस्थेत आढळुन आले. त्यापैकी 1 चितळाचे संपुर्ण मास व 2 चितळापैकी काही प्रमाणात मास हे विल्हेवाट लावण्यात आलेले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृत्यू चितळाचे शवविच्छेदन संजय आर. रोडे पशुवैद्यकीय अधिकारी भद्रावती याच्याकडुन करण्यात आले. आरोपी कवडु महादेव बोंढे रा. मांगली वय 50 वर्ष धंदा शेती विरुध्द वनगुन्हा क्रमांक-09194/229828/2021 दिनांक 31/12/2021 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन अटक करून त्यास दिनांक 02/01/2022 प्रथम श्रेणी न्यायालय भद्रावती येथे हाजर करण्यात येईल.
या प्रकरणात अजून काही आरोपी गुंतलेले असल्याचे गावात चर्चा आहे .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment