Ads

कचरा घोटाळा पूर्णत्वास नेण्यासाठी भोजन घोटाळ्याचा आधारकचरा घोटाळा पूर्णत्वास नेण्यासाठी भोजन घोटाळ्याचा आधार


The basis of the food scam to complete the waste scam
चंद्रपुर :-कचरा संकलनाची पहिली निविदा रद्द करताना नियम डावलण्यात आले. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेला 40 कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.मात्र महानगर पालिकेतील सत्ताधारी व आयुक्त राजेश मोहिते यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने नियम डावलून कचरा संकलनाचे काम स्वयंभू एजन्सीला देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र या प्रकरणाचा वाद थांबला नाही.न्यायालयाच्या निकालाचा आपल्या सोयीने वापर करून मेसर्स स्वयंभू एजन्सीला काम देण्याचा प्रयत्न मनपाच्या भ्रष्ट पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केला.सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर हा प्रयत्न सुध्दा अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागल्याने आयुक्त मोहिते रजेवर गेले. कारवाईच्या भीतीने आयुक्त मोहिते यांनी कचरा संकलनाची फाईल थंडबस्त्यात टाकली.आयुक्तांनी कचरा संकलनाच्या प्रकरणातून माघार घेतल्याने मनपातील भ्रष्ट सत्ताधाऱ्यांची गोची झाली.कचरा संकलनाच्या कंत्राटदारा सोबत 'अर्थ'पूर्ण व्यवहार संपन्न झालेला असल्यामुळे आयुक्त मोहिते यांच्यावर दबाव आणण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांनी भोजन घोटाळ्या विरुद्ध कारवाई करण्याची अप्रत्यक्ष धमकी मोहिते यांना दिली.परिणामी मोहिते यांनी बदलीचा पर्याय स्विकारला अशी प्रतिक्रिया नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली.
भोजन घोटाळ्याच्या संदर्भात सभागृहामध्ये वारंवार पुरावे देवून कारवाईची मागणी केली.मात्र उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून आयुक्तांच्या भोजन घोटाळ्याची चौकशी करण्याचा अफलातून प्रकार महापौर राखी कंचर्लावार यांनी केला. भर सभागृहात आयुक्त मोहिते यांची बाजू घेऊन त्यांना महापौरांनी क्लिन चिट सुध्दा दिली होती.मात्र आता महापौर राखी कंचर्लावार यांनी भोजन घोटाळ्याची फाईल मागवून कारवाई करण्याचा इशारा दिल्याचे प्रसिध्दी माध्यमातून माहितीस आले.
कचरा संकलनाचे कामातील भ्रष्टाचार पूर्णत्वास नेण्यासाठी महापौर कंचर्लावार भोजन घोटाळ्याचा आधार घेत असल्याचे बदलीच्या घटनेवरून स्पष्ट होते असा आरोप सुध्दा शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment