Ads

क्या हुआ तेरा वादा..? मृत वनश्रीचा परिवाराचा लोकप्रतिनिधीनां सवाल

What happened to your promise ..? Question to the people's representative of the family of the deceased Vanashree
चंदपुर:- चंदपुर वायुपेठ येथील मृत वनश्रीच्या कुटुंबियांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. केवळ प्रसिद्धी आणि चमकोगिरीसाठी नेत्यांनी खोटी आश्वासने देऊन मृत वनश्रीचे कुंटुबीयांची अवहेलना केली आहे. असा आरोप आम आदमी पक्षाने केला. वनश्रीला न्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी पश्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

स्व. वनश्री आंबटकर या मुलीची दि. ०९/०९/२०२१ रोजी एका विकृत व्यक्तीने एकतर्फी | प्रेमातून अमानुषपणे हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह संतप्त बाबुपेठ वासियांनी रोखून धरला. त्यावेळी आमदार किशोर जोरगेवार, पोलीस उप अधिक्षक, अतुल कुलकर्णी यांनी सदर प्रकरण फॉस्ट ट्रॅक कोर्टात चालवू, पिडितीच्या परिवारातील एका सदस्याला नौकरी देऊ दोषी पोलिस अधिकारी यांना निलंबित करू असे आश्वासन दिले होते. घटनेच्या २ दिवसानंतर हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर वायांसारख पसरलं. अनेक नेत्यांनी पिडीत परिवाराला भेटून आश्वासने दिली.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालविला जाईल. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नेमला जाईल असे आश्वासन दिले. खासदार बाळू धानोरकर यांनी पिडित परिवाराची भेट घेत न्याय मिळवून देईपर्यंत शांत बसणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली.

माजी अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लेखोराला कठोर शिक्षा देण्यास प्रयत्न करू | असे आश्वासन दिले. घटनेच गंभीर्य बघून मनपाने थाठात उद्घाटन करून पोलिस चौकी सुरू केली. या आश्वासनांना प्रसिध्दी मिळाली. नेत्यांनी आपली स्वतःची वाहवा करून घेतली. आज ती पोलीस चौकी उघडते कमी आणि बंदच जास्त राहते. नेत्यांच्या चमकोगिरी करण्याच्या नादात वनश्रीच्या कुटुंबियांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. केवळ प्रसिध्दी आणि चमकोगिरीसाठी नेत्यांनी खोटी आश्वासने देवून मृत वनश्रीचे कुटुंबियाची अवहेलना केली आहे. असा आरोप आम आदमी पक्षांनी केला. वनश्रीला न्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देखील आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा महानगर निवडणूक प्रभारी सुनिल देवराव मुसळे आणि शहर सचिव राजू कुळे यांनी दिला आहे.

पत्र परिषेदला पिडित परिवार तसेच युवा जिल्हा अध्यक्ष मयुर राईकवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, सिकंदर सागोरे, राजेश चेडगुलवार, दिलीप तेलंग, बबन किष्णपल्लीवार तसेच इतन अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment