Ads

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे सावित्री माईंच्या लेकींचा महिला शिशिकांचा सन्मान ..


चंद्रपूर:-
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या वतीने महिला शिक्षकांच्या सन्मानाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले शाळा येथे करण्यात आले होते.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले प्रदेशाध्यक्ष .रुपाली चाकणकर, यांच्या सूचनेनुसार महिला जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने महात्मा ज्योतिबा फुले शाळा येथील सर्व महिला शिक्षकांचा सन्मान माजी नगराध्यक्ष दिपक जयस्वाल महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हाउपाध्यक्ष रश्मी झोटींग विधानसभा उपाध्यक्ष पूजा सेरकी यांच्या हस्ते कर्तबगार महिला मुख्याध्यापिका बबिता उईके अध्यक्ष मनीषा दुमाणे चंद्रकांता मंडपे ज्योत्स्ना नागरिकर नम्रता जोगी शिक्षिका यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी महिला जिल्हाध्यक्ष म्हणाल्या सावित्री माईच्या लेकी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत.आज या पवित्र दिनी त्यांच्या कार्याचा सन्मान होणे हेच महिला राष्ट्रवादीचे कर्तव्य असल्याचे मत बेबीताई उईके यांनी व्यक्त केले .दीपक जयस्वाल यांनी सावित्रीबाई यांनी केलेल्या कार्याचे अनुकरण करून आजच्या महिलानी पुढाकार घेऊन कार्य करावे तरच समाजात परिवर्तन होईल असे मत व्यक्त केले यावेळी उपस्थित विध्यार्थी पालक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment