Ads

शासकीय कामात अडथळा निर्माण करणारे राजू झोडे यांचेवर गुन्हा दाखल करा अन्यथा कामबंद आंदोलन


चंद्रपूर :-
वन संपत्तीने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्य जीव संघर्षाच्या घटनेत वाढ झाली आहे. कधी वाघाची शिकार तर कधी नैसर्गिक मृत्यू मात्र यामध्ये वनविभाग आडमुठी भूमिका घेत काहींवर अमानुषपणे मारहाण ही करीत आहे. सध्या वनविभागातील अतिक्रमण चा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे
Chandrapur forest department राजू झोडे रा. बल्लारशाह वनविभागातील सर्व क्षेत्रीय कामामध्ये अडथळा निर्माण करून गावातील लोक व वनविभागामध्ये दरी निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहे. सन २०२० मध्ये वनविभागाच्या अतिक्रमण काढण्यामध्ये सुद्धा लोकांचा जमाव क्षेत्रीय कर्मचारी यांना धमकी देणे व शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणे असे कृत्य केलेले आहे. त्या कृत्याच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु त्यावर आजतागायत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

त्यानंतर इतर वनविभागाच्या क्षेत्रीय कामामध्ये वारवार हस्तक्षेप केलेला आहे. भा.व.अ. १९२७ च्या अनुषंगाने त्यांचेवर गुन्हा नोंदविण्यात आलेला असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच दिनांक ३१/१२/२०२९ रोजी श्री. भारत रामदास कोवे रा.डोणी यांचे मृत्यूचे प्रकरणात गुप्त माहितीनुसार जंगलामध्ये वाघाच्या शिकारीसाठी गेलेला असल्याचे माहिती प्राप्त झालेली होती. त्या अनुषंगाने मुल वनपरिक्षेत्र ता.अ.व्या.प्र. (बफर), चंद्रपूर मध्ये वनगुन्हा क्रमांक ०९७००/२४२४७६ दिनांक ०१/०१/२०२२ नोंदविण्यात आलेला असून त्याचे पुढील चौकशीसाठी दोन लोकांना बोलाविण्यात आलेले होते व त्याची पुढील चौकशी सुरु होती. चौकशी दरम्यान श्री. राजू झोडे लोकांना मडकवून क्षेत्रीय वनकर्मचारी यांचे कामात अडथळा निर्माण करून त्यांना मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. तसेच पुढील कार्यवाही न होण्याकरिता त्यांनी डोणी व फुलझरी गावातील लोकांना एकत्र करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या दृष्टीने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. वनविभागाच्या कामात अडथळा निर्माण करण्यासाठी प्रसारमाध्यमामध्ये चुकीच्या बातम्या प्रसारित करीत आहे. त्याकरिता नेहमी वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी यांना त्रास देणारा श्री. राजू झोडे याचेवर भा.द.वि. ३५३ अन्वये गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मांगणी चंद्रपूर वनवृत्तातील सर्व क्षेत्रीय वनकर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे
अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात वनविभागातील कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारेल असा इशारा यावेळी देण्यात आला
यावेळी फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनचे चंद्रपूर अध्यक्ष बी. के. तुपे, व्ही. एस. राजूरकर, आर.जी.मुन, राहुल कारेकर व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment