चंद्रपूर : आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे घरात आणि बाहेर सर्वच ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. औद्योगिक प्रदूषणासोबतच नागरिकांकडून होणारे प्रदूषण सुद्धा आहे. वाहनाचा, धूर, धूळ, कचरा, लाकूड, कोळसा ज्वलंत यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. औद्योगिक क्षेत्रात कोळसा ज्वलंत, राख यामुळे वायू प्रदूषण होते. दूषित वायू प्रदूषणामुळे मागील २० वर्षांपासून चंद्रपूरकर त्रस्त आहे. सन २००५ - ०६ मध्ये चंद्रपूरचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आरोग्याच्या समस्यांची भयावहता दिसून आली. त्यानंतर अनेकदा मागणी करून देखील हे सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे आता १६ वर्षानंतर आरोग्य सर्वेक्षण करण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांची पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर शहरात आणि औद्योगिक क्षेत्र खुटाळा या दोन ठिकाणी दररोज वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषणाची नोंद घेतल्या जाते. हि शासकीय यंत्रणेद्वारे घेतलेली नोंद आहे, मात्र जिल्हयात ज्या भागात उद्योग आहे. तिथे अशीच भयावह परिस्थिती आहे. सन २०२१ या वर्षातील १२ महिन्याच्या आकडेवारीत चंद्रपूरच्या प्रदूषणाच्या दृष्टीकोनातून आरोग्यासाठी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्यातील महिने चांगले आहे.
दरवर्षी या महिन्यात हेच चित्र असते. या महिन्यातील १२२ दिवसांत ९० दिवस चांगले, २० दिवस साधारण तर २२ जून या एकाच दिवशी जास्त प्रदूषण आढळले. फ़ेब्रुवारी, मार्च, एफ्रिल, मे या उन्हाळ्यातील महिन्यात जास्त तापमानामुळे थोडे अधिक प्रदूषण आढळले. या महिन्यातील ११८ दिवसांत ७५ दिवस प्रदूषण जास्त होते. ३२ दिवस समाधानकारक नव्हते. १४ दिवस आकडेवारी उपलब्ध नव्हती. त्याचप्रमाणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे हिवाळ्यातील महिने थंडीमुळे हवा स्थिर असल्याने अतिशय जास्त आणि धोकादायक असतात. या महिन्यात १२३ दिवसात ९२ दिवस जास्त प्रदूषण होते. २६ दिवस चांगले आणि पाच दिवसाची आकडेवारी उपलब्ध नव्हती. प्रदूषणाची हि भयावह स्थिती आकडेवारीतून समोर आली आहे. आता आरोग्य सर्वेक्षण झाले तर प्रदूषणाचे शहरवासीयांवर होणारे गंभीर परिणाम समोर येथील. शासनाला त्यावर उपायोजना करण्यासाठी निश्चित आकडेवारी मिळेल. त्याकरिता आरोग्य सर्वेक्षण करण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांची पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.
0 comments:
Post a Comment