चंद्रपुर :-परिवाराची जबाबदारी उत्तमरित्या पेलावणा-या सावित्रीच्या लेकीं क्रिडा, शैक्षणीक क्षेत्रासह सांस्कृतीक क्षेत्रातही महत्वाची भुमिका बजावत असून सांस्कृतीक क्षेत्रातून भारतीय संस्कृतीला जिवंत ठेवण्यात सावित्रींच्या लेकींची भूमिका महत्वाची राहिली असल्याचे प्रदिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शिक्षिका संघटनेच्या वतीने मूल रोडवरील संताजी जगनाडे वसतिगृह येथे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, डाॅ. कौशल्या अडवाणी, स्वरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव अडबाले, डाॅ. अक्षयकुमार चैव्हाण, डाॅ. नाझीश रहमान, भुवनेश्वरी धर्मपुरीवार, सरोज चांदेकर, आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, सांस्कृतीक क्षेत्रातून भारतीय संस्कृतीला जिवंत ठेवण्याचे मोठे काम प्रामुख्याने महिलांकडून केल्या जात आहे. महिलांच्या उन्नतीसाठी महिलांना योग्य व्यासपीठ मिळवून देत तसे वातावरण निर्मिती करण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने केल्या जात आहे. परिणामी महिला वर्ग मोठ्या संख्येने संघटनेशी जुळत असल्याचे यावेळी ते म्हणाले,
मुलींसाठी शिक्षणाचे दार उघडे करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत असतांना त्यांनी महिलांना मिळवून दिलेल्या हक्काची महिलांनी नेहमी जाण ठेवली पाहिजे, महिलांनी शिक्षित होण्यासह जागृत होणेही तेवढेच आवश्यक असून आता सावित्रीच्या लेकींनी सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली. यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीचे काम कौतूकास्पद असून समाजातील गरजू महिलांपर्यंत पोहचून त्यांना शक्य ती मदत करण्याचे काम त्यांच्या वतीने केल्या जात आहे. महिलांना न्याय देण्यासह महिला सशक्तीकरण हा देखील या संघटनेचा प्रमूख उद्देश असून त्या दिशेने काम केल्या जात आहे. परिवाराची जबाबदारी पार पाडत असतांना महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष होते. यासाठी भविष्यात आपण महिलांसाठी मोठे आरोग्य शिबीरे आयोजित करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले, तसेच महिलांसाठी स्वतंत्र जिम तयार करण्याच्या दृष्टिने माझे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. सांस्कृतीक क्षेत्रात महिलांचे नेहमीच अमुल्य योगदान राहिले आहे. महिलांनी सांस्कृतीक क्षेत्रात देशाचे नाव जगाच्या पटलावर पोहचविण्याचे काम केले आहे. कमी संसाधनातही त्यांनी प्रामाणिकतेने प्रयत्न करत आपल्यातील कलागुण जोपासला असल्याचेही ते यावेळी म्हणाले,
कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतांना आरोग्याकडेही लक्ष दया - विद्युत वरखेडकर
महिला निरोगी राहिल्यास ती कुटुंबाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडू शकते त्यामूळे तिने आठवड्यातून एक दिवस तरी स्वतासाठी जगत आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन या कार्यक्रमात बोलतांना अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले. त्या यावेळी म्हणाल्या की, त्याकाळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षामूळेच मी आज या पदा पर्यंत पोहचू शकले आहे. त्यांनी केलेली महिला शिक्षणाची क्रांती आपल्याला पूढे नेण्याची गरज आहे. घराच्या उंभरट्या बाहेरही आपल्याल्या योग्य स्थान असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्यात. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण आघाडीच्या पदाधिका-र्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महिला शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment