प्रतिनिधी सुशी दाबगावं:-पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेणाऱ्या वृध्द इसमाने स्वतःच्या पत्नीला शरण रचून शरणावर जिवंत जाळल्याची घटना मुल तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सुशी दाबगावं येथे मंगळवार ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. जळालेल्या अवस्थेत नागरिकांनी उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात नेत असताना प्रकूर्ती जास्तच गंभीर असल्याने वाटेतच मृत्यू झाला. मुक्ताबाई गंगाराम शेंडे वय ६५ वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपी पतीचे नाव गंगाराम सोमाजी शेंडे वय 74 वर्षे हे आहे.
सुशी दाबगावं येथील मुक्ताबाई गंगाराम शेंडे या मंगळवारी सरपणां करिता लाकडे आणायला गेल्या होत्या दरम्यान सरपणं गोळा करायला गेलेल्या वृध्द पत्नीचा राग मनात ठेऊन सरपना वरून घरी परत आल्यानंतर मुक्ताबाई हिच्या आरोपी पती गंगाराम याने सारपणां करिता गेल्याच्या कारणा वरून वाद निर्मान केला व तिच्याच सरपणाची शरण रचून ठेऊन आधी तिच्या डोक्यावर वार करून मारझोड केली आधीच तहानलेली मुक्ताबाई जंगलातून त्रासून घरी आल्यानंतर साधा पाणीही न पिऊ देता मारझोड केल्याने अशक्त पडलेल्या वृध्द महिलेला तिच्याच सरपणाच्या लाकडाचं शरण रचून तिला त्यावर लेटाऊन डिझेल टाऊन पेटून टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेचे समाजमन सुन्न झाले असून अखं आयुष मिळून संसार केल्यानंतर एन शेवटच्या क्षणी वृध्द आरोपी गंगाराम यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला जिवंत जाळल्या ने गाव व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
जळालेल्या अवस्थेत मुक्ताबाई शुद्ध येताच बचावासाठी आरडाओरड केली असता नागरिकांनी तिला वाचविण्यासाठी चंद्रपुर येथील रुग्णालयात नेले असता प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी नागपूर रेफर केल्या असता वाटेतच प्राणज्योत मालवली.
आरोपी गंगाराम शेंडे याच्यावर मुल पोलिसांनी कलम 326,302 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मुल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
नाती मुळे वाचले मुलीचे प्राण
सरपनां गोळा करून आल्यानंतर मृत मुक्ताबाई आपल्या नातीनला पिण्याचे पाणी आणायला सांगितले दरम्यान मुक्ताबाई व गंगाराम यांच्यात सरपण वरून वाद चालू झाल्याने सोडविण्ासाठी गेलेल्या अपंग मुलीला मारझोड केली त्यातच मुलीने प्रसंगावधान राखत मृत महिलेच्या मुलीला तिच्या मुलीने घरात नेऊन ठेवले व आतून दार लावले त्यामुळे त्या नातिन मुले मुलीचे प्राण वाचू शकले अन्यथा पत्नीसह मुलींचाही मृत्यू झाला असता असे गावात पडसाद उमटत आहेत.
0 comments:
Post a Comment