Ads

विविध ऐतिहासिक ठिकाणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Former Union Minister of State for Home Hansraj Ahir hoisted the flag at Martyr Veer Baburao Shedmake Memorial and Historic Binba Gate in Chandrapur

चंद्रपूर :-देशात सर्वांना समानता, सर्वांना समान अधिकार देणार संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल आहे ते आपण देशात 26 जानेवारी रोजी अंगलात आले म्हणून आजचा दिवस या देशातील सर्व उच- निच, गरिब-श्रीमंत या सर्वांना समानतेचा दिवस असल्याने प्रजासत्ताक दिन म्हणून देशात साजरा केला जातो असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर येथील जेल परिसरातील शहिद विर बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मृतीस्थळ व ऐतिहासिक बिनबा गेट येथे झेंडावंदन कार्यक्रम प्रसंगी केले.

प्रसंगी वीर शहिद बाबुराव शेडमाके स्मारक समिती चे अध्यक्ष दयालाल कन्नाके, उपाध्यक्ष विलास मसराम, प्रा. अषोक तुमराम, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेविका ज्योती गेडाम, चंद्रकला सोयाम, अनुराधा हजारे, आशाताई आबोजवार, शितल आत्राम, चंदना जांभुळकर, राजु घरोटे, विनोद शेरकी, धनराज कोवे, मोहन चौधरी उपस्थित होते.

पुढे बोलतांना हंसराज अहीर यांनी सांगीतले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारमधील सर्वांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. "सबका साथ - सबका विकास" ही घाषणा लोकशाही ला धरून असून हे मंत्र, हीं घाषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आहे. लोकशाहीचा आदर करणारा संसदेत संविधानाची पुजा करणारा या देशाचा प्रधानमंत्री देशाच्या अखंडेकरिता, देशाच्या सुरक्षिततेकरिता, देशातील आतंकवाद, उग्रवाद संपविण्याकरिता, देशातील घुसखोरी थांबविण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाऊले उचलली असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.

या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच संबिधान हेच कामी येणार असल्याचेही ते म्हणाले. शहिद बाबुराव शेडमाके शहिद स्थळ हे सूवर्ण अराणे लिहावे असे पवित्र स्थळ असून याठिकाणी मागील 5 वर्षापासून झेंडावंदनाचा कार्यक्रम केल्या जात आहे. येथील पिंपळाच्या झाडाला कांतीकारी बाबुराव शेडमाके यांना इंग्रजांनी फाशी दिली होती ते हे पवित्र स्थळ आहे. या स्मारकाचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रजासत्ताक दिन हा देशातला मोठा उत्सव आहे. संपूर्ण देशात हा उत्सव साजरा करण्यात येत असून देशातील व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जनतेला हंसराज अहीर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या तेसच आदिवासी समाजसेवकांचा अहीर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी अरविंद मडावी, एकनाथ कन्नाके, कमलाकर मडावी, सरीता सोयाम, राजेंद्र तिवारी, बी.बी. सिंग, राजु येले, पुनम तिवारी, गौतम यादव, तुशार मोहुर्ले, गिरीष गुप्ता, विकास खटी, राहुल सुर्यवंशी, प्रविन चुनारकर, राहुल बोरकर, गुकेश यादव, उमाबाई खोलापुरे, निलेश खोलापुरे, पुष्पा नंदबंशी, सचिन कुमरे, नकुल आचार्य, कार्तिक मुसळे, आकाश डोंगरे, बाबु यादव, सचिन वैरागडे, प्रकाश डोंगरे यांचेसह नागरीक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment