चंद्रपुर :- मरणोत्तर अवयवदान नेत्रदान व देहदान चळवळ समाजातील सामान्य लोकांपर्यंत पोचल्यास जलप्रदूषण ,वायु प्रदूषण व आरोग्य संशोधन उपक्रमाला बळ मिळेल तसेच पर्यावरणाला बळकटी येईल असे प्रतिपादन देहदान चळवळ प्रचारक इंजिनियर श्री प्रदीप अडकीने यांनी उपस्थितांसमोर बोलताना केले.
ते पुढे असेही म्हणाले की देहदान करारपत्र सादर केल्यावर मृतात्म्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांनी तत्परता दाखवायची फार मोठी गरज आहे.
विकलांग सेवा संस्थेतर्फे त्यांनी आजवर अनेक मृतदेह मेडिकल कॉलेजला वैद्यकीय संशोधनाकरीता पुरविण्यासाठी महत्तम सहकार्य केल्याबद्दल चंद्रपुर गौरव सन्मानपत्र, टोपी, शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अनिल दहागावकर, देवराव कोंडेकर ,अशोक खाड़े ,प्रसाद पान्हेरकर व अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते.
याप्रसंगी 100 शिवभोजन लाभार्थ्याना मिठाईचे वितरण करण्यात आले तसेच अडकीने यांनी संस्थापयोगी साहित्य उपलब्ध करून दिले. कार्यक्रम स्वागतगीत अनुराधा मेश्राम यांनी तर खुशाल ठलाल ,मेघा शहारे सीमा कीनाके इत्यादींनी सहकार्य केले .
0 comments:
Post a Comment