भद्रावती (तालुका प्रतिनिधी):- आज दिनांक ९ जानेवारी २०२२ ला "संत शिरोमणी सावता माळी अभियाना" अंतर्गत भद्रावती येथील बगळे वाडी मध्ये खुल्या पटांगणावर शेतकरी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
शेतकरी बाजाराचे उद्घाटन मा. प्रवीण ठेंगणे साहेब सभापती पंचायत समिती भद्रावती यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाला ग्राहक पंचायत भद्रावती चे सर्व पदाधिकारी, कृषी विभाग भद्रावती चे कर्मचारी तसेच शेतकर्यां सोबतचं अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांना शेतातील ताजा भाजीपाला, धान्य मिळाले पाहिजे. याकरिता "पिकेल ते विकेल" या संकल्पनेवर आधारित "संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची" सुरुवात आज करण्यात आली.
ग्राहक पंचायत भद्रावती यांनी भद्रावती मध्ये शेतकरी बाजार असावा. ज्यामध्ये शेतकरी आपला शेतमाल थेट ग्राहकाला विक्री करू शकला पाहिजे. अशी संकल्पना मांडली होती. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि ग्राहकांना ताजा आणि स्वस्त भाजीपाला मिळेल. यासाठी ग्राहक पंचायत भद्रावती यांनी शेतकरी बाजारासाठी नगरपरिषद भद्रावती ला जागेची मागणी केली तसेच कृषी अधिकारी भद्रावती यांचेकडे शेतकरी बाजार याविषयी चर्चा करुन शेतकऱ्यांसोबत सभा घेण्यात आली.
नगर परिषद भद्रावती यांचेकडून शेतकरी बाजारा करिता योग्य जागा दिली. तसेच कृषी विभाग भद्रावती यांनी सुद्धा यासाठी खूप मेहनत घेऊन आज शेतकरी बाजाराची सुरुवात भद्रावती येथे करण्यात आली.
शेतकरी बाजारात एकूण आठ गावच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. पिंपरी गावचे संदीप कुटेमाटे, हेमंत बोबडे, संतोष कुटेमाटे, रामचंद्र डांगे, सुरेश आसकर, डाखरे, चपराळा गावचे भारत ताजणे, चिरादेवीचे महेंद्र पोयाम, लक्ष्मण वासेकर, नंदोरी गावचे सुनील उमरे, कोंढ्याचे मंगेश नागपुरे, आष्टी (काकडे)गावचे अमोल जीवतोडे, मोरव्याचे कवडू भोगेकर आणि विसापूर चे प्रफुल टोंगे या सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
शेतकरी बाजारात गुड, काकवी आणि सर्व प्रकारचा ताजा भाजीपाला विकाला ठेवण्यात आला होता. या उपक्रमामुळे भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळाल्याने भद्रावती शहरातील नागरिकांनी भाजीपाला विकत घेण्यासाठी गर्दी केली होती.
यावेळी ग्राहक पंचायत भद्रावती चे अध्यक्ष वामन नामपल्लीवार, पुरुषोत्तम मत्ते, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, प्रविण रामचंद्र चिमुरकर, लोकमान्य विद्यालय भद्रावती चे सचिन सरपटवार सर आणि पत्रकार बंधु उपस्थित होते.
कृषी विभाग भद्रावतीच्या कृषी अधिकारी कुमारी मोहिनी जाधव, पी.जी. कोमटी, मु. बी. झाडे, एस.सी. हिवसे, एम.एस. वरभे, पी.एम. ठेंगणे, एम.एन. ताजणे आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांनी शेतकरी बाजारासाठी अथक मेहनत घेतली.
भद्रावती करांना असे आवाहन करण्यात येत आहे की, आठवड्याच्या प्रत्येक रविवारला दुपारी ३ वाजेपासून बगडे वाडी येथील शेतकरी बाजारात जाऊन ताजा भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून विकत घ्यावा.
0 comments:
Post a Comment