Ads

भाजपा घुग्घुसतर्फे पंजाब काँग्रेस सरकारचा निषेध.

BJP Ghughhus protests Punjab Congress
घुग्घुस प्रतिनिधी :- घुग्घुस येथील गांधी चौकात सकाळी ११ वाजता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे पंजाब दौर्‍यावर असताना त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत जाणीवपूर्वक त्रुटी निर्माण करून त्यांचा जीवाला धोका निर्माण करण्याऱ्या पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस सरकारचा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
पंजाब सरकार हाय हाय, पंजाब सरकार मुर्दाबाद, पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी करणाऱ्या पंजाब काँग्रेस सरकारचा निषेध असो अशी निषेधपुर्ण नारेबाजी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, पंजाब येथील फिरोजपूरच्या दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले असता पंजाब काँग्रेस सरकारने त्यांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक त्रुटी निर्माण केली. पंतप्रधान ज्या रॅली साठी गेले होते त्या रॅलीचा मार्ग बंद केला नाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. सुमारे वीस मिनिटे पुलावर पंतप्रधानांच्या ताफ्याला थांबावे लागले. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
आज देशाचे पंतप्रधान कोणत्या एका राजकिय पक्षाचे नसतात, ते संपूर्ण देशाचे नेतृत्व करतात. त्यांच्या दौर्‍याची पूर्वकल्पना असून सुद्धा पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने मोदीजींच्या सुरक्षा यंत्रणेत जाणिवपुर्वक त्रुटी निर्माण करून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. याची आम्ही निंदा करतो.
निषेध आंदोलनानंतर, जवळील शिव मंदिरात जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी दुधाचा अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली.
यावेळी माजी जि. प. सभापती नितु चौधरी, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे जेष्ठ नेते संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, भाजपाचे विनोद चौधरी, रत्नेश सिंग,पारस पिंपलकर माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, सिनू इसारप, प्रकाश बोबडे, पूजा दुर्गम, सुचिता लुटे, नंदा कांबळे, वैशाली ढवस, जेष्ठ नागरिक मधुकर
मालेकर, प्रेमलाल पारधी, शैलेंद्र कक्कड, हसन शेख, मल्लेश बल्ला, शाम आगदारी, राजेश मोरपाका, मानस सिंग, सुनील राम, श्रीकांत सावे, महेश लठ्ठा, रंजित डवरे, निळा चिवंडे, सुनीता वर्मा, सुनंदा लिहीतकर, विक्की सारसर अनिल मंत्रिवार अजय आमटे, संजय भोंगळे, रवी चुने प्रवीण सोदारी हेमंत पाझरे सुशील डांगे हेमंत कुमार विनोद जंजर्ला, सुरेन्द्र जोगी सीनु आडे गणेश खुटेमाते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment