Ads

घुग्घुस शहरात एआयएमआयएम ची जोरदार एंट्री

powerful entry of AIMIM in Ghugus city
घुग्घुस :-शनिवार 8 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बालाजी लॉन, घुग्घुस येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने "हमारा काम ही हमारी पहचान है" असा नारादेत भव्य पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. अनेक युवकांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेत एआयएमआयएम पक्षाने घुग्घुस शहरात जोरदार एंट्री केली आहे त्यामुळे अनेक राजकीय पक्षाच्या भुवया उंचावल्या आहे.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जावेद पाशा महाराष्ट्र प्रवक्ता व जिल्हाप्रभारी, नाहिद हुसैन जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, अजहर शेख शहराध्यक्ष चंद्रपूर सैय्यद अमान अहेमद जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, शाहिद शेख जिल्हा युथ अध्यक्ष चंद्रपूर ताहिरा शेख महिला संघटक विदर्भ प्रदेश, शबाना शेख महिला जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, आयशा शेख महिला शहराध्यक्ष चंद्रपूर समीर मिर्झा शहर प्रभारी घुग्घुस उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
याप्रसंगी घुग्घुस येथील अनेक युवक, पुरुष व महिलांनी पक्षात प्रवेश घेतला प्रमुख पाहुण्यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलतांना प्रमुख पाहुणे प्रा. जावेद पाशा महाराष्ट्र प्रवक्ता व जिल्हा प्रभारी हे म्हणाले येणाऱ्या घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीत एआयएमआयएम पूर्ण ताकतीने उतरणार आहे. आमची भूमिका केवळ निवडणूक लढण्याची नसून घुग्घुसचा प्रथम नगराध्यक्ष हा एआयएमआयएम पक्षाचा बसवू असा आमचा विश्वास आहे. घुग्घुसच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन काम करू सत्ता हस्तगत करणे हा आमचा उद्देश आहे निश्चितच घुग्घुस नगर परिषदेची सत्ता आम्ही काबीज करू असा विश्वास व्यक्त केला.
साजिद सिद्दीकी शहराध्यक्ष घुग्घुस, अख्तर हुसैन शहर उपाध्यक्ष घुग्घुस, इरशाद वाहिद शहर महासचिव घुग्घुस, इसराईल शाह शहर सचिव घुग्घुस, जुल्फकार शेख कोषाध्यक्ष घुग्घुस, एजाजुद्दीन शेख मीडिया प्रभारी घुग्घुस, सोहेल शेख युथ शहराध्यक्ष घुग्घुस, शमा खान वार्ड क्र.4 शाखा अध्यक्ष, नूरजहाँ कुरेशी वार्ड क्र.3 शाखा अध्यक्ष, शबनम खान वार्ड क्र.2 शाखा अध्यक्ष यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
संचालन नौशाद सिद्दीकी यांनी केले व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment