चंद्रपुर:- अनाथांची माय म्हणून देशभरात ओळख निर्माण करणाऱ्या सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांच्या निधनाची बातमी मनसुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने अनाथांची माय कायमची हरपली असल्याची भावना सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर दिलेल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.
अत्यंत विपरीत परिस्थितीत सिंधुताई सपकाळ यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला. खरतड मार्गाने त्यांनी केलेला यशस्वी प्रवास, त्यांचा हा जिवनसंघर्ष येत्या काळातही अनेक भावी पिढ्यांना प्रेरणा देत त्यांच्या कार्याला उजाळा देत राहील. त्यांच्या या भेटीतून नवी ऊर्जा मिळायची. त्या आमच्या चंद्रपूर जिल्ह्या लगतच्या वर्धा जिल्ह्यातील होत्या त्यांच्या अनेक सत्यकथा समाजाला नेहमीच प्रेरित करत राहतील. ज्यांच कोणी नाही अशा अनाथांना मातृप्रेम देणाऱ्या मातेला देश कधीही विसरणार नाही. माई अशी अचानक आमच्यातून निघून गेल्याने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. अशी भावना या शोकसंदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
0 comments:
Post a Comment