भद्रावती तालुका प्रतिनिधी (जावेद शेख):-भद्रावती तालुक्यातही सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खासदार आमदार यांनी भेट देऊन आढावा घेतला.
राज्यात कोरोना या महाभयंकर आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. बाळूभाऊ धानोरकर तसेच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. सौ प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट देऊन येणाऱ्या ओमिक्रोन तसेच कोरोना या भयानक आजाराचा आढावा घेऊन या भागात कोरोना विषाणूचा शिरकाव न व्हावा आणि त्याच्या पासून जनतेचं रक्षण कसे करता यावे या बाबत नियोजण करण्या संबंधी सूचना देण्यात आल्या तसेच खासदार आमदारांन कडून प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली या वेळी चंदनखेडा ग्रामपंचायत चे सरपंच श्री. नयन बाबाराव जांभुळे तसेच उपसरपंच सौ. भरतीताई उरकांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आसुटकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. झाडे, माजी सरपंच श्री. सुमित मुडेवार श्री. सलाम शेख, श्री. प्रशांत काळे परिसरातील ग्रामपंचायतिचे सरपंच तसेच सदस्य उपस्तीत होते.
0 comments:
Post a Comment