Ads

मनपा मध्ये मोकाट कुत्रे सोडू आप चे राजु कुडे यांचा मनपाला अल्टिमेटम

Raju Kude's ultimatum to the Municipal Corporation to release stray dogs
चंद्रपुर :- चंद्रपूर महानगरातील बाबूपेठ प्रभागामध्ये मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या अचानक वाढली असून लहान मुलांवरती तसेच दुचाकी वाहनावर्ती हे मोकाट कुत्रे हल्ले करत आहे ,
बाबुपेठ मधील लुंबिनी नगर, माता मंदिर चौक, तुकाराम चौक, विकतू बाबा मंदिर परिसर, आंबेडकर नगर, छत्रपती चौक अश्या अनेक वॉर्डांत मोकाट कुत्र्यांनी धमाकुळ माजवले आहे अशी तक्रार आम आदमी पक्षाकडे प्राप्त झाली, पक्षाने याची दखल घेत अचानक कुत्र्यांची संख्या आपल्या प्रभागात का वाढत असल्याचे शोध घेतले असल्यास धक्कादायक बाब समोर आली, त्यामध्ये महानगरपालिकेतील कर्मचारी शहरातील मोकाट कुत्रे पकडून सदर बाबुपेठ परिसरात आणून सोडत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली.
मनपाच्या या घृणास्पद कार्याबाबत आज आप चे शहर सचिव राजू भाऊ कूडे यांच्या नेतृत्वात मनपाचे आयुक्त यांची भेट घेण्यात आली असून संतप्त आपचे सचिव राजू कुळे यांनी मनपा आयुक्तांना लवकरात लवकर मोकाट कुत्र्याची व्यवस्था करा अन्यथा मोकाट कुत्री मनपात सोडू असा इशारा देण्यात आला. यावेळेला आप चे शहर सचिव राजू भाऊ कुडे, बाबा नगर चे शाखा अध्यक्ष सागर बोबडे, माहेर घर चौक चे शाखा अध्यक्ष विशाल रामगीरवार, दिपक चूनारकर, कालिदास ओरके, दिपक निपाने, अशोक आंबटकर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment