Ads

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी काही तासात केले ए.टी.एम. फोडणारे आरोपींना गजाआड

चंद्रपुर :-दि. 17/01/2021 रोजी रात्रौ दरम्याण दोन अज्ञात इसम महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया शाखा बल्हारशा या बँकेचे ए.टी.एम.ATM मध्ये प्रवेश करूण ए.टी.एम. फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा प्रयत्न फसला त्यावरूण पोलीस स्टेशन बल्हारशाह येथे अपराध कमाक 67 / 22 कलम 379,511,34 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर घटना हि गंभिर स्वरूपाची असल्याने मा. पोलीस अधिक्षक सा. यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास करण्या करीता स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांना आदेशीत केले त्यावरूण पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे व सचिन गदादे यांचे नेतृत्वात दोन पथक तयार करण्यात आले. पथका मार्फत तपास सुरू केला असता यातिल आरोपीतांनी अत्यंत सफाईदार पणे सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आले. बँक मध्ये असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले असता सदर गुन्हा हा दोन व्यक्तिने केला असल्याचे दिसुन आले. सी.सी.टी.व्ही फुटेज प्रमाणे आरोपीतांचा माग असता यावरूण असे दिसुन आले कि सदर गुन्हा हा बल्हारशा येथील सराईत आरोपी नामे दिपक उर्फ राकेश अजय राजपुत वय 19 वर्ष रा. किल्ला वार्ड चिंतावार यांचे घरी बल्हारशाह चंद्रपुर व त्याचा साथिदार यांनी नामे गिरजा शंकर विश्वकर्मा रा बल्हारशाह यांने केल्याचे निष्पण झाले.

यातील आरोपी हे सराईत आरोपी असल्याने त्यांनी या आधि काही चोरीच्या घटना केल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्र बैंक ऑफ इंडिया शाखा बल्हारशाह या बँकेचे ए.टी.एम. फोडतांना त्यांनी सफाईदार पणे सदर गुन्हा केला होता त्यावरूण आरोपीताना पकडण्यात अडचण येत होती. गुन्हयाचा तपास करीत असतांना खास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर खबर मिळाली की आरोपी नामे दिपक उर्फ राकेश अजय राजपुत किल्ला वार्ड येथिल किल्यामध्ये येणार आहे अशि माहीती प्राप्त झाली त्यानुसार गुप्त माहितीदाराच्या माहितीप्रमाणे आम्ही सापळा कार्यवाही केली असता सदर इसम हा त्याचे जवळ असलेला वाहण कमाक एम.एच.34 बि.डी. 2882 या वाहणाणे आला असता त्यास ताब्यात घेतले. नमुद यातील आरोपींनी घटनेच्या दोन दिवसा आधि महाकाली मंदिर चंद्रपुर जवळुन सदर वाहण चोरी केल्याचे सांगितल्याने सदर मो.सा. वापरूण बल्हारशा येथील महाराष्ट्र बॅकचे ए.टी.एम फोडले असल्याचे सांगीतले. तसेच त्याआधि एक पाणटपरी सुदधा फोडल्याचे सांगितले. नमुद आरोपीस अटक करण्यात आली असुन सदर आरोपी हा पोलीस कोठडीत आहे.

सदरची यशस्वी कामगीरी मा. श्री. अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे, पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे सचिन गदादे पंडीत वन्हाटे, संजय आतकुलवार स्वामीदास चालेकर 680 अनुप डांगे, दिपक डोगरे, नितेश महात्मे प्रसाद धुळगंडे, मयुर येरणे, कुंदनसिंग बावरी, रविंद्र पंधरे, गोपाल आतकुलवार नितीन रायपुरे, प्राजल झिलपे, संदिप मुळे यांचे पथकाने केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment