ब्रम्हपुरी :-ब्रम्हपुरी येथील पॉलिटेक्निक - कमल धाब्याजवळ चार दिवसाअगोदार एका बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दोन कुटुंबाचा आधार असणारे दोन युवक मृत्यूमुखी पडले आहेत. यात बोलेरो वाहनाचा चालक सध्या फरार असून गाडीमालक मात्र आपला जीव वाचविण्यासाठी सावरासावर करताना दिसून येत आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की, दि. १६/१/२०२१ रोजी दु. १.३० वाजता खरबी येथील रहिवाशी आशिष मूळे व समीर बागडे हे दोन युवक वैयक्तिक कामाकरिता दुचाकीवरून ब्रम्हपुरी कडे जात होते. मागून भरगाव वेगाने येणाऱ्या अनियंत्रित बोलेरो वाहन क्र. एम.एच. ३५ के ३२४७ ने या दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनेनंतर बोलेरो वाहनाचा चालक फरार झाल्याचे माहिती मिळत आहे. या अपघातात आशिष मूळे यांचा जागीच मृत्यू झाला तर समीर बागडे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे. हे दोन्ही युवक आपल्या कुटुंबाचे कमावते व आधार असणारे व्यक्ती होते. याविषयीचा तपास ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन करीत असून, त्यांनी मृतकाच्या कुटुंबाला धडक देणारे बोलेरो वाहन चोर चोरी करून घेऊन जात होते अशी माहिती दिली आहे. या बोलेरो वाहनाच्या चोरीची तक्रार कुही पोलीस स्टेशन मध्ये झालेली आहे अशी त्यांनी माहिती दिली आहे.
याविषयी माहिती मिळवली असता असे दिसून येत आहे की, या बोलेरो वाहनाचे मालक एक राजस्थानी गृहस्थ असून काही वर्षांपासून कुही येथे वास्तव्यास आहे. त्यांनी काही दिवसागोदरच या आरोपी चालकाला आपल्या वाहनावर नोकर म्हणून ठेवले होते. तो चालक ब्रम्हपूरी येथे बहिणीला भेटण्यासाठी या बोलेरो वाहनाने निघाला होता. मात्र या बोलेरो वाहनाचा मालक स्वतःची बाजू लपविण्यासाठी आपले वाहन चोरीला गेले असे भासवून याविषयीची तक्रार कुही पोलीस स्टेशन मध्ये देऊ पाहत आहे अशी माहिती मिळत आहे. चालकाला फरार ठेवून चोरीची तक्रार देऊन आपण सुरक्षित होऊ असा त्यांचा उद्देश असू शकतो. मात्र आपल्या कर्तव्यात दक्ष असणारे महाराष्ट्र पोलीस असल्या कृत्याला थारा देणार नाही यात काहीच शंका नाही...! या गाडी मालकाची पोलीस प्रशासनाने जर कसून चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी उजेडात येईल असे दिसून येत आहे. कर्तव्यदक्ष असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांकडून योग्य चौकशी होऊन या मृत झालेल्या युवकांच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळावा अशी अपेक्षा सर्वांना आहे.
0 comments:
Post a Comment