चंद्रपुर :-चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष संदिप आवारी यांनी 27. 63 कोटी रुपये तुट असलेला 319.59 कोटी रूपये खर्चाचा अर्थसंकल्प आज सादर केला. निळ्या पुर रेषेमुळे शहरातील गुंठेवारीची सर्व प्रकरणे प्रलंबित असताना गुंठेवारीतून 7 कोटी रुपयांचे उत्पन्नाचा अंदाज बांधण्यात आलेला आहे.अशाच प्रकारे अर्थसंकल्पात उत्पन्नाच्या अनेक बाबी फूगवून दाखविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पातील खरी तूट 50 कोटी रूपयांच्या जवळपास आहे.
यापूर्वी महानगरपालिकेची विविध बँकेमध्ये एकूण जवळपास 50 कोटी रुपयांची एफडी होती. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे अनुदान देण्यासाठी 25 कोटी रुपयांची एफडी तोडण्यात आलेली आहे. राखून ठेवण्यात आलेल्या पैशातून खर्च भागविण्याचा हा प्रकार आहे. आजमितीस मनपाकडे केवळ 15 कोटी रुपये एफडी च्या स्वरूपात जमा आहेत.
मनपाचे कर्मचारी व कंत्राटी कामगार यांचे वेतनावर एकूण वार्षिक 60 कोटी रुपयांच्या जवळपास खर्च आहे. आर्थिक तूट वाढत असतान प्रत्येक ठिकाणी काटकसर करणे गरजेचे असूनही मनपातील सत्ताधारी निधीचा सर्रासपणे दुरुपयोग करीत आहेत. कंत्राटदाराच्या हिताचे धोरण सत्ताधारी राबवत असल्यामुळे मनपाला करोडो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.एकूनच चंद्रपूर महानगरपालिकेची वाटचाल दिवाळखोरी कडे होत आहे. अनेक ठिकाणी गरज नसताना व जनतेची मागणी नसताना कंत्राटदारांच्या हिताची कामे करण्यात येत आहेत. याचा आर्थिक फटका महानगरपालिकेला बसत आहे. अडचणीच्या काळात महानगरपालिकेची आर्थिक लूट करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे दुष्परिणाम भविष्यात चंद्रपूरकरांना भोगावे लागतील याची खंत वाटते.
0 comments:
Post a Comment