Ads

2 कोटी रूपयाचे फसवणुकीच्या गुन्हयात 3 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने पालघर येथुन घेतले ताब्यात

Accused wanted for 3 years in fraud case of Rs 2 crore arrested by local crime branch from Palghar

चंद्रपुर :-सन 2015 मध्ये पंकज पुरुषोत्तम फुलझेले रागंजवार्ड, चंद्रपूर याने ओरीएंट अॅन्ड ओझस बायोटेक नावाची कंपनी व वर्कदत सोसायटी वाडी, नागपूर स्थापन करून त्यात त्याने काही लोकांना एजन्ट म्हणून नौकरीला ठेवून त्यांचे ओळखीचे व ईतर लोकाकडून कंपनी मध्ये पैसे गुंतवणूक करून त्यावर आकर्षक व्याज कंपनीच्या प्रॉफीट मधून देण्याचे आमिष देवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याचे आमिषाला बळी पडून काही सेवानिवृत्त लोकांनी त्याचेकडे गुंतवणूक केली. त्यातुन सुरवातीला गुंतवणुकदारांना आकर्षक व्याज दिल्याने लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे लोकांनी एकूण 2 करोड़ रूपये त्यांचे कंपनीत गुंतवणूक केले. परंतू काहि दिवसानंतरच लोकांना व्याज देणे बंद केले व लोकांनी त्यास पैसे परत मागीतले तेव्हा त्याने व्याज किंवा मुदद्दल सुद्धा दिले नाही. त्यावरून दि. 15/04/2019पो.स्टे. रामनगर येथे अप. क्र. 484 / 2019 कलम 420,34 भा. द. वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा दाखल होताच तो कुटूंबासह पसार झाला. सदर गुन्हयाचा तपास सुरू असतांना मा. पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आरोपीचे शोध संबंधाने आदेशीत केले असतांना सदर आरोपीचे शोधार्थ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तांत्रीक तपास करून आरोपीचे लोकेशन जिल्हा पालघर येथे असल्याची माहिती प्राप्त करून सदर बोबडे व पो.हवा. अभय मुर्तरकर यांना माहिती देवून पालघर येथे रवाना करून पो. ठिकाणी लागलीच स.पो.नि. स्टे. पालघर हददीत आरोपीचा शोध घेतला असता तो लक्ष्मी लॉज येथे असल्याची महिती मिळाले वरून त्यास लक्ष्मी लॉज येथून ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे घेवून आले व पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पो.स्टे. रामनगर यांचे स्वाधीन करण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरवींद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था. गु. शाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो उप नि अतुल कावळे, पो.हवा. अभय मुर्तरकर, पो.स्टे. रामनगर, ना.पो.कॉ. अनुप डांगे, पो.कॉ. जमीर पठाण, मिलींद चव्हाण, दिनेश अराडे, प्रमोद कोटनाके यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगरचे सहायक पोलीस निरीक्षक, खरसान हे करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment