Ads

बंजारा भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्या- खासदार बाळू धानोरकर


चंद्रपूर : लोकगीते व लोकनृत्यासाठी प्रसिद्ध असलेला बंजारा समाज पुरातन काळापासून घरदार सोडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे. एस. टी, एस. सी, ओबीसी, व्ही. जे. एन. टी या प्रवर्गात विखुरला आहे. बंजारा भाषा संपूर्ण भारतात एक आहे. त्यामुळे या भाषेला संविधानातील ८ व्या सूची मध्ये समाविष्ट करून या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली.

शुन्य प्रहरात लोकसभेत बोलतांना खासदार बाळू धानोरकर यांनी संसद भवन ज्या जागेवर उभे आहे. ती जागा बंजारा समाजाचे लकीशा बंजारा यांनी ब्रिटिश सरकारला दान दिली होती. याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. बंजारा समाजाच्या या भूमीशी भावनात्मक जवळीक लक्षात घेता या ठिकाणी दानवीर लकीशा बंजारा यांचा पुतळा व संसद मार्गाला त्यांचे नाव द्यावे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

आपल्या भारतात बंजारा समाज शैक्षणिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या फार मागे आहे. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यांना एक विशेष वर्गात समाविष्ट करून सर्वागीण विकासाच्या मार्ग मोकळा करावा व घटनेच्या ८ व्या सूचित बंजारा भाषेचा समावेश करून राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्यावा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी आज लोकसभेत केली. या मागण्या पूर्ण झाल्यास बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात विकासाच्या मुख्य प्रवाहात येता येणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment