Ads

व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याकरिता बजरंग दलच्या युवकांचे आवाहन🙏🏻.

चंद्रपुर :-दरवर्षी 14 फेब्रुवारीला आपल्या देशात आणि जागतिक पातळीवर काही देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. मात्र व्हॅलेंटाईन डे हा पाश्चिमात्य देशांत साजरा होणारा सण असून तो आपल्या देशात येऊन आपली संस्कृती व सभ्यता नष्ट करत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी व्हॅलेंटाईन डे ही पाश्चिमात्य संस्कृती साजरी करू नये असे आवाहन बजरंग दलाकडून करण्यात आले आहे.
या संदर्भात बजरंग दल चंद्रपूर चे महानगर संयोजक तुषार चौधरी यांनी 13 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. देशात प्रेमाच्या नावाखाली अश्लीलता पसरवणारा दिवस बजरंग दल कधीही मान्य करणार नाही, असे ते म्हणाले.
तसेच 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आपले काही सैनिक वीर गतीला प्राप्त झाले आणि त्याच दिवशी आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment