Ads

नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन देण्याचा मुद्दा घेऊन आम आदमी पार्टीची कामगार आयुक्तांना भेट.

घुग्घुस :-घूग्घुस नगरपरिषदमध्ये ग्रामपंचायत होती तेव्हा पासून काम करीत असलेल्या स्थायी, अस्थायी स्वरुपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगरपरिषद घोषित होऊन एक वर्ष लोटून गेले असले तरीसुद्धा नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जात नाही ही खूप दुर्दैवी बाब आहे. याची दखल घेत आम आदमी पार्टी घूग्घुस द्वारा सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार आणि नगरपरिषद घूग्घुस ला सुद्धा तक्रार करत यांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी म्हणून आम आदमी पार्टी सतत लढा देत आहे.या संदर्भात आज दिनांक १६/०२/२०२२ रोजी परत एकदा सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे मॅडम यांना भेटून चर्चा करत एक महिन्याचा कालावधी मध्ये जर या विषयाचा तोडगा निघाला नाही तर आम आदमी पार्टी घूग्घुस नगरपरिषद कर्मचाऱ्यांना घेऊन नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार अशी चेतावणी आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे व आम आदमी पार्टी शिष्टमंडळ द्वारा देण्यात आली व अश्याप्रकरचे शोषण आम आदमी पार्टी घूग्घुस होऊ देणार नाही अशी घोषणा केली.
यावेळी आम आदमी पार्टी, जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, महिला सदस्य उमा टोक्कलवार, पूनम वर्मा,विपश्यना अनुप धनविजय,सोनम शेख,अंजली नगराळे,रूबिया शेख,विजया उपलेट्टी,शिला उपलेट्टी,हसीना शेख,कविता विष्णु भक्त,देविणा नाईकाप,नईमा शेख,धम्मदिणा नायडू सोबत,शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, प्रशांत पाझारे, प्रशांत सेनानी, रवी शंतलावार, अभिषेक तलापेल्ली, ,सागर बिऱ्हाडे,अनुप नळे, स्वप्नील आवळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते...
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment