Ads

इंदिरा नगर येथिल विविध मागण्यांसाठी यंग चांदा ब्रिगेडचा मोर्चा धडकला महानगर पालिकेवर .

चंद्रपुर :- इंदिरा नगर येथे मुख्य नाल्याचे बांधकाम करण्यात यावे या प्रमूख मागणीसह इतर मागण्यांना घेऊन आज गुरुवारी यंग चांदा ब्रिगेडचा मोर्चा मनपा विरोधी नारेबाजी करत महानगर पालिकेवर धडकला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर प्रमूख वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, शहर संघटक तापोष डे, नितेश गवळे, रुपेश मुलकावार, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, नरेश आत्राम, सिध्दार्थ मेश्राम, धिरज मानकर, आशा देशमूख, आनंद रणशूर, राम जंगम, देवा कुंटा, विलास सोमलवार, गणेश किन्नेकर विलास वनकर आदिंची उपस्थिती होती.
इंदिरानगर येथिल दूर्गधीयूक्त आरोग्यास धोकादायक नाल्याच्या भीषण समस्ये बाबत मनपा प्रशासनाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने वांरवार निवेदन देण्यात आले होते. असे असतांना मनपा प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे या विरोधात आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा कार्यालयावर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दुपारी एक वाजता यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मनपा विरोधी फलक झळकवत तसेच नारेबाजी करत सदर मोर्चा महानगर पालिका कार्यालयावर धडकला. मोर्चा मनपा कार्यालयावर पोहचल्या नंतर मोर्चाचे रुपांत्तर सभेत झाले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांनी मनपा प्रशासन गाढ झोपेत आहे. इंदिरा नगर येथील समस्या सोडविण्यात याव्यात या करिता आपण मनपा प्रशासनाला वांरवार निवेदने दिलेत मात्र त्याची दखल घेण्याची गरज मनपा प्रशासनाला वाटली नाही. त्यामूळे आज इंदिरा नगर येथील नागरिकांचा रोष अनावर झाला आणि त्याचे रुपांत्तर मोर्चात झाल्याचे ते यावेळी म्हणाले या नंतरही मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी बोलतांना जितेश कुळमेथे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. यावेळी शिष्ट मंडळाने मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. यात येथील नाल्याचे बांधकाम करण्यात यावे अमृत कलश योजनेचा लाभ येथील नागरिकांना देण्यात यावा येथील रस्ता नालीचे बांधकाम करण्यात यावे येथील स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे आदि मागण्यांचा समावेश आहे. यावेळी यावेळी मंदा महतो, ममता हलदार, निलकंट गुरनुले, गजानन पाल, शरद बोरीकर, अनिरुध्द धवणे, चेतलाल कावळे, शितल चांदेकर, दिनेश इंगळे, विक्की रेगंटीवार, अविनाश पवार, अजय मेश्राम, यांच्यासह इंदिरा नगर वासीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment