गेल्या३० वर्षापासून यात्रा वार्डातील सब्जीमंडी परिसरात भगवान शंकरजी यांचे स्थापित मंदिर आहे ,आणि याच परिसरात आठवडी बाजार भरतो काल घडलेल्या घटनेत एका अज्ञात समाजकंटकाने भगवान शंकरजी यांच्या मूर्तीला दगड मारून तोडले असा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत ,सदर बातमी ही शहरात वार्यासारखी पसरली असता याच अनुषंगाने आज दि.१७/०२/२०२२ला सकाळी१०वाजता पोलीस विभागाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले तसेच हिंदू समाजातील काही नागरिकांनी पोलीस विभागाला एक निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी केली या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शांतता कमिटी तसेच व हिंदू समाजाच्या माध्यमातून भगवान शंकराजी यांचा फोटो तयार करून त्या जागेवर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे व महाशिवरात्रीला मूर्ती बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले,आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस विभागाने चार पथके तयार केले असून आरोपीला तात्काळ अटक करू असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment