भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
भद्रावती तालुक्यातील बरांज (मो.)
येथील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांमधील शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत लढा लढण्याकरीता भारतीय जनता पार्टी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिली.
येथील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांमधील शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत लढा लढण्याकरीता भारतीय जनता पार्टी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिली.
बरांज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या न्याय उचित मागण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकलेखा समिती अध्यक्ष तथा माजी कॅबीनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात बंराज खुली कोळसा खान प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारलेला असुन विविध मागण्यांच्या पुर्ततेकरीता केंद्रीय कोळसा मंत्री भारत सरकार यांच्याशी चर्चा व बैठकीच्या माध्यमातुन उचित कार्यवाही होत आहे. दि.७ फेब्रुवारी रोजी बरांज खुली कोळसा खाण येथील प्रकल्पग्रस्त कामगारांच्या तसेच शेतकऱ्यांच्या व ग्रामवासीयांच्या न्याय उचित मागण्यासाठी देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली भद्रावती येथे बैठक संपन्न झाली.
बैठकीमध्ये महत्वाच्या विषयांवर प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा करण्यात आली. त्यात पूर्वीच्या कार्यरत प्रकल्पग्रस्त कामगांराचे थकीत वेतन, सुधारीत नियुक्तीपत्र , नवीन वेतन निर्धारण, कामगांराना मिळणाऱ्या भविष्य निर्वाह निधी,विमा, अवकाश, बोनस, क्वार्टर, बससेवा , वैद्यकिय सेवा इत्यादी सुविधा मिळणे, पूर्वीचे कार्यरत प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी कामगार यांना कन्फर्मेशन लेटर देऊन नवीन वेतन लागु करणे, प्रकल्पग्रस्त कुंटुबातील पात्र सदस्यांना स्थायी नोकरी किंवा नोकरी ऐवजी एकमुस्त आर्थिक मोबदला देणे, कंपनीत कार्यरत असलेल्या ज्या कामगारांचा मृत्यु झालेला आहे त्या कामगांराच्या कुटुंबातील पात्र सदस्यास कंपनीमध्ये कायम स्वरूपी नोकरी देणे किंवा त्या ऐवजी एकमुस्त आर्थिक मोबदला देणे, प्रकल्पबाधीत बंराज मोकासा तांडा, चेकबरांज आणि पिपरबोडी गावाचे पुनर्वसन करणे,कंपनीमध्ये किमान ८० टक्के स्थानिक बेरोजगांराना समाविष्ट करणे, बरांज (मो.) व चेकबरांज येथील उर्वरीत शेतजमीन संपादित करणे, कंपनी प्रशासनाने केलेल्या कराराप्रमाणे संपादित केलेल्या शेतजमीनी पैकी ५० टक्के शेत जमीन शेतकऱ्यांना परत करणे किंवा त्याऐवजी एकमुस्त आर्थिक मोबदला देणे. या विषयांसह इतर विषयांचा समावेश आहे.
बैठकीला प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी तथा भद्रावती पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे, कामगार प्रतिनिधी संजय ढाकणे, बंराज येथील सरपंच मनिषा ठेंगणे, उपसरपंच रमेश भुक्या, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीराम महाकुलकर, सुधीर बोढाले, मारोती निखाडे, लक्ष्मण मुक्या आणि शेकडो प्रकल्पगस्त उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment