भद्रावती:-भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांचं नुकतंच निधन झाले.देशवासीयांच्या मनातील सुरांचे आज एक युग संपले.लतादीदी या पिढ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील.सिनेश्रुष्टि मधील भावूक लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील.कारण भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात आपल्या सुरांनी घर करून जाणाऱ्या गानकोकिळा शतकात पुन्हा होणे नाही असे भावुक उद्गार चुटकी बहुद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक लिमेश्वर माणुसमारे यांनी व्यक्त केले.स्थानिक चुटकी बहुद्देशीय विकास संस्था संपूर्ण गवराळा वासीयांतर्फे आयोजित भारतरत्न लतादीदींच्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.प्रसंगी या कार्यक्रमात गावातील जेष्ठ नागरिक नामदेव बदखल,वीरभद्र समाजाचे शहर काँग्रेस सचिव अरुण शिंदेवार,महिला बचत गट प्रमुख रत्नमाला खडसे,
समाजीक कार्यकर्त्या नंदा कुटेमाटे,पत्रकार सुनील बिबटे,राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमण राखुंडे,महादेव खडसे,देवेंद्र वडस्कर, निमेश माणुसमारे,मंदा नागभीडकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा बाल गोपाल आदी उपस्थित होते.पुढे माणुसमारे म्हणाले की संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं.त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी जगात एकमेव होत्या.अशा शब्दात त्यांनी गानकोकीळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमात उपस्थित मान्यवर मंडळींनी स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगशेकर यांचे निधन ही सर्वात दुखद घटना आहे. या संगीतक्षेत्रातील मोठी हानी असून एक पोकळीच निर्माण झाली आहे.अशा भावना व्यक्त करून त्यांनी लता दिदींच्या गाण्यातील त्यांना आलेले आपापले अनुभव प्रकट केले.पत्रकार सुनील बिबटे यांनी आपल्या मनोगतात लतादीदींचं जाणं हे आपल्या सारख्या मराठमोळ्या आणि जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या गाण्यातील वैविध्य, दैवी सूर यांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांनी आवाजातून भारताचं सौंदर्य मांडलं. भारतरत्न लतादीदींची कारकीर्द कालातीत आहे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक तथा आभार आयोजक लिमेश्वर माणुसमारे यांनी केले.तत्पूर्वी लता दिदींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.बालगोपालांकडून शेकडो मोमबत्या पेटवून दोन मिनिटांचे मौन बाळगत दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुरेश पेंदाम,शामकर आत्राम आदींनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment