चंद्रपूर:- ऑक्टोबर महिन्यापासून एसटी कामगारांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी संप पुकारला, या संपात आजपर्यंत तब्बल 84 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.
कामगारांच्या आंदोलनाला बळ मिळावे यासाठी अनेकांनी संपकरी कामगारांना अन्नधान्य व साहित्याचे वाटप केले.
104 दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेक पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला, चंद्रपूर आगारातून सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यात पसरले, अनेक जिल्ह्यात कामगारांनी हातात संपाचे शस्त्र घेत आंदोलन सुरू केले.
या आंदोलनाने महाराष्ट्राची जिवनदाहिनी लाल परीचे चाके थांबले, अनेक कामगारांचा आंदोलनाला वाढत असलेला पाठिंबा व शासनात विलीनीकरण या हक्काची मागणी घेत आंदोलन मोठ्या रुपात सुरू झाले.
आज आंदोलनाला 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही महाविकास आघाडी सरकार कामगारांना कामावरून कमी करीत आहे.
तरीही कामगारांनी मागे वळून न बघता आंदोलन त्याच पद्धतीने सुरू ठेवले आहे.
आता या आंदोलनाला दुखवट्याचे स्वरूप आले, कामगारांच्या आंदोलनाला बळ मिळावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर शाखेने आज आंदोलन मंडपात भेट देत खाद्यतेलाचे वाटप केले.
यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन, उपाध्यक्ष अनिल देठे, मार्गदर्शक धर्मेश निकोसे, सचिव विनोद पन्नासे, कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, प्रसिद्धी प्रमुख धनराज कोवे व सदस्य विक्की गुप्ता यांची उपस्थिती होती.
अध्यक्ष राजेश सोलापन यांनी यावेळी कामगारांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांना धीर दिला व आज आम्ही छोटीशी मदत करीत आहो परंतु पुढेही आम्ही मदत अशीच सुरू ठेवू.
एक दिवस सरकारला तुमच्यासमोर झुकावे लागेल त्यादिवशी आपण सर्व मिळून विजयोत्सव साजरा करू.
यावेळी आंदोलक कामगारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment