Ads

"शर्म करो मोदी" भद्रावती काँग्रेसने घोषणाबाजी देत केला मोदींचा निषेध

"Shame on Modi" Warora Congress shouted slogans against Modi

भद्रावती( तालुका प्रतिनिधी ):-काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेमध्ये केले, जे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. ही बाब महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे. वास्तविक कोरोनाने सूपर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेला असतांना 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम घेवून मोदींनी लाखोंची गर्दी केली आणि त्यामाध्यमातून कोरोना देशात पसरवला. मोदींनी फक्त ट्रम्पचा कार्यक्रम घेण्याकरीता विमानतळ बंद केले नाही व हवाई वाहतूक सुरु ठेवून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढयाची परिस्थिती निर्माण केली. देशात कोरोनाचे संकट कायम असतांनाही बिहार राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आली, परिणामी तेथे कोरोनाचा विस्फोट झाला. पुढील टप्प्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढलेला असतांना देखील काळात पश्चिम बंगाल, आसाम, तामीळनाडू, केरळ आणि पोंडीचेरी या राज्यात विधानसभा निवडणूका घेण्यात आल्या. खऱ्या अर्थाने कोरोना पसरविण्याचे पाप हे मोदी सरकारनेच केले आहे. मात्र उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून, स्वतःचे पाप महाराष्ट्रावर लादण्याचा केविलवाणा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यातून केला आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जनता हे कधीही खपवून घेणार नाही, सहन करणार नाही.
महाराष्ट्राची भूमिका नेहमीच दातृत्वाची राहीली आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेचा कुठलाही विचार न करता अविवेकीपणाने सरळ लॉकडाऊन लावून देशासमोर मोठे संकट उभे केले. या लॉकडाऊन दरम्यान कुठलीही दळण वळण यंत्रणा केंद्र सरकारने कार्यान्वीत केली नाही. परिणामी परराज्यातील मजूरांना व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या महिला, लहान मुले व वयोवृध्दांना हजारो किलोमीटर पायी चालत घरी जाण्याची वेळ नरेंद्र मोदी यांच्या अमानवीय निर्णयामुळे ओढवली होती. या दरम्यान पायी प्रवास करणाऱ्या हजारो मजूर व लहान मुलांना त्यांचे प्राण गमवावे लागले, त्यांच्या रक्ताच्या पाऊलखुणा अजूनही कायम आहेत. मात्र चोराच्या उल्ट्या बोंबा या ठिकाणी दिसून येतात.

लोकसभा संसद मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यच्या निषेधार्थ आज दि 9 फेरवरी 2022 रोज ला भद्रावती तालुका शहर काँग्रेस कॉमिट तर्फे तहसील कार्यालय समोर निषेध मोर्चा काढण्यात आले.मोर्च्या मध्ये 'शर्म करो मोदी' घोषणाबाजी देण्यात आली.
 यावेळी भद्रावती काँग्रेस शहर व तालुका काँग्रेस कॉमिट चे पदाधिकारी प्रशांतकाळे,सूरज गावंड,विनयबोधी डोंगरे,सुनील तेलंग,चंदू दानव, तन्वीर शेक, प्रमोद नागोसे, निखील राऊत, प्रशांत झाडे संदेश रामटेके,सुधीर खोब्रागडे, राकेश मेश्राम,गोलू कुरेशी, अजित फाडके रामदास सुरभद्रावती शहर व तालुका महिला काँग्रेस च्या नगरसेविका पदाधिकारी सरीतताई सूर,धोमने ताई, जयश्री दाताळकर, प्रतिभाताई निमकर, शीतल गेडाम, कविता सुपी,अर्चना रामटेके,प्रतिभा रायपूरे उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment