भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
भद्रावती तालुक्यातील माजरी-पाटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर यांनी अथक प्रयत्न करुन क्षेत्राच्या विकासासाठी एक कोटी दोन लाखाचा फंड उपलब्ध करुन विकासकामांना गती दिली आहे.
माजरी, पाटाळा, कुचना, पळसगांव,राळेगाव, थोराना,मनगांव, माजरीवस्ती,नागलोन इत्यादी गावात अनेक सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण, नाल्या, रस्ते यांची निर्मिती, स्मशानभूमीत शेड निर्मिती इत्यादी कामांचे लोकार्पण व भूमिपूजन चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अर्थ- बांधकाम सभापती राजू गायकवाड, भद्रावती पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे, माजी महिला व बालकल्याण सभापती अमृता सुर, पंचायत समिती माजरी के सदस्य चिंतामण आत्राम,सेवा सहकारी संस्था माजरीचे अध्यक्ष प्रदीप हेकाड, तसेच नागलोन, पाटाळा, चालबर्डी, कुचना, मनगांव, पळसगांव, विसलोन, बेलोरा इत्यादी गावांचे सरपंच उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment