Ads

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात महत्वपूर्ण विषयांचा अभाव : खासदार बाळू धानोरकर Lack of important topics in President's address: MP Balu Dhanorkar


चंद्रपूर : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मत मांडताना खासदार बाळू धानोरकर यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हंटले आहे कि, राष्ट्रपतींचे भाषण अर्धवट व देशातील महत्वपूर्ण मुद्द्यांचा अभाव असलेले हे अभिभाषण आहे. पंतप्रधान दिवसरात्र जे बोलत असतात. त्याच गोष्टींचा समावेश यात आहे.

कोरोना काळात सरकारी अव्यवस्थेमुळे जवळपास ५० लाख पर्यंत मृत्यू झाले त्याबाबत काहीही उल्लेख नाही. तसेच मृतकाच्या परिवारांना काय मदत केल्या गेली, याचा देखील यात उल्लेख नाही. यात सरकारच्या संवेदनशील पणाचा उल्लेख झाला. पण काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांना एक वर्ष रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागले. यात ७५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला या गोष्टींचा देखील या अभिभाषणात विसर पडलेला दिसतो. प्रधानमंत्री आवास योजनेचे ४ करोड घरे होणार होती. पण अर्धे उद्दिष्ट सुद्धा साध्य झालेले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा देखील हवेतच विरली.

सबका साथ सबका विकास चे नारे खूप दिलेत पण वास्तवात एस. टी, एस. सी. ओबीसी महिला व अल्पसंख्याकांवरील हल्ल्याबाबत यात कुठेही वाच्यता झाली नाही. या मोदी सरकारकडून रेल्वे पासून जहाजापर्यंत सर्वच विक्री होण्याची भीती आहे. केवळ कार्यक्रम घोषित होतात, मात्र वास्तवात अंधकार आहे. राष्ट्रपती यांचे अभिभाषण हे भविष्याचा वेध घेणारे भाषण असते. परंतु यावेळी केलेले भाषण हे निवडणुकीचा भाषणाप्रमाणे असल्याचे दिसून आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment