Ads

चंद्रपूर-नागपूर महामार्गा वर दोन दुचाकी वाहनांची जोरदार धडक


वरोरा :- चंद्रपूर - नागपूर महामार्गावरून दोन युवक एम एच 31 आर 4310 या क्रमांकाच्या दुचाकीने नागपूरवरून चंद्रपूरकडे जात असतांना एम एच बी यु 8834 या क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीला धडक दिली यामध्ये ऍक्टिव्हा वाहन स्वार जागीच ठार झाला. तर बॉक्सर बजाज दुचाकी स्वार दोन युवक गंभीर जखमी झाले. सदर अपघाताची घटना 2 फरवरी 2022 ला दुपारी 3.30 वाजता घडली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार सुरू आहे.
या अपघातात ऍक्टिव्हा वाहन स्वार मधुकर • राऊत वय 45 रा. एकार्जुना यांचा जागीच मृत्यू झाला. तर बजाज बॉक्सर वरील शशांक सिंग वय 20, रा. चंद्रपूर, अथर्व माधामशेट्टीवार वय 18, रा. चंद्रपूर हे गंभीर जखमी झाले आहे.

सदर मृतक मधुकर राऊत हा एकार्जुना येथून आपल्या दुचाकीने साकार नगर कडे जात असतांना नागपूरवरून येणाऱ्या दुचाकीने मृतकाचे दुचाकी वाहनाला जबर धडक दिली. यामध्ये मधुकर राऊत हा जागीच ठार झाला. मृतक हा एका फार्म हाऊस वर कामाला होता. तो एकार्जुना येथे किरायाने राहतो. घटनेच्या दिवशी तो आपल्या कामावर जात असल्याचे समजते. सदर अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment