Ads

गोंडपिपरी नगरपंचायतीवर काँग्रेस -शिवसेना सत्तारूढ

Congress-Shiv Sena ruling over Gondpipri Nagar Panchayat
गोंडपिपरी प्रतिनिधी:-नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती(9याखुला) राखीव होते.काँग्रेस ७,भाजपा ४,शिवसेना२, अपक्ष२,राष्ट्रवादी २ असे पक्षीय बलाबल होते तर दोन अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.नगराध्यक्ष पदासाठी तीन नामनिर्देशन दाखल झाले त्यात काँग्रेस कडून सविता कुळमेथे ,भाजपातर्फे मनीषा मडावी,रा.कॉ कडून सविता चंदेल.बुधवारी राकॉच्या चंदेल यांनी माघार घेतली.काँग्रेस-भाजपात नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होती.लढतीत ११ ,६ ने काँग्रेसच्या सविता कुळमेथे यांनी बाजी मारली तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या सारिका मडावी अविरोध निवडून आल्या शिवसेनेने गड राखला.आमदार सुभाष धोटे,माजी नगराध्यक्ष अरुण धोटे,जिल्हा प्रमुख गिऱ्हे,जिल्हा उपप्रमुख संदिप करपे,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी नवनियुक्तपदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले यावेळी शेकडो कॉंग्रेस व शिवसेना पदाधिकारी समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. केवळ दोन नगरसेवक असताना उपनगराध्यक्ष पदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडली.शिवसेनेने जिल्हा उपप्रमुख संदिप करपे यांच्या नेतृत्वात भगवा फडकवला
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment