Ads

16 वर्षीय मुलाला दुर्गापुरातून बिबट्याने उचलून नेले

चंद्रपूर / दुर्गापूर:- दुर्गापूर परिसरात वन्य प्राण्यांच्या आतंक सुरुच. बुधवारी रात्री च्या सुमारास 52 वर्षीय भोजराज मेश्राम यांना वाघाने ठार केले होते, सदर घटनेनंतर राजकीय पक्षांनी वीज केंद्र व वनविभागावर ताशेरे ओढले.
सदर घटना ताजी असताना पुन्हा दुर्गापूर नेरी येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा राज भडके याला बिबट्याने Leopard attack उचलून नेल्याची घटना गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दुर्गापूर ग्रामपंचायत च्या मागील भागांत राज हा जात असताना अचानक बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला, घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस व वनविभागाच्या चमूने शोधकार्य सुरू केले आहे. वनविभागाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्यात वनविभाग पूर्णतः अपयशी ठरले आहे असा ठपका सुद्धा भटारकर यांनी वनविभागावर ठेवला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment