Ads

पिरली भद्रावती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
दि. १७.०२.२०२२ रोज गुरूवार ला सकाळी १०.०० वाजता पिरली ता. भद्रावती या गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये गावाची स्वच्छता, सामुहिक दिंडी, मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच किर्तनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रमा मध्ये समावेश करण्यात आला होता. गुरुदेव सेवा मंडळ पिरली आयोजित या कार्यक्रमाचे औचीत्य साधुन गावाच्या मध्य भागी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मुर्ती स्थापन करून सगळी कडे ग्रामगीतेचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला.

सदर कार्यक्रमामध्ये गुरूदेव सेवा मंडळ पिरली चे अध्यक्ष मा. श्री. दिलीपराव खेळेकर, ग्रामगिता रत्न श्री रामकृष्ण पेंदोर, सागरा. प्रचारक श्री बाळासाहेब पडवे, आष्टा उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. मोरेश्वरजी टेमुर्डे साहेब मा. उपसभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य, प्रमुख पाहुणे मा. श्री. रमेश राजुरकर, श्री प्रवीनजी ठेंगणे, श्री भास्करजी ताजणे, श्री नवरत्न मोदी, श्री सुधाकरजी रोहनकर व पिरली गावाचे ग्रामस्थ श्री निलेश मोदी, श्री नंदूभाउ वाढई इत्यादी उपस्थित होते.

प्रत्येकाने आपल्या बौध्दिक तसेच आर्थिक क्षमतेप्रमाणे व्यवसायाची निवड केल्यास आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे सहज शक्य आहे. कोणत्याही व्यवसायाची सुरूवात लहानापासून करावी, त्यातील बारकावे शोधुन एक-एक पायरी वर चढत गेल्यास आपण यशस्वी उद्योजक होउ शकता. तसेच गावकऱ्यांनी स्वतःची आर्थिक प्रगती करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत गावाचा व स्वतःचा आर्थिक आणि सामाजिक विकास करावा. ग्रामगीता ही सगळ्यांनी वाचन करून ती आपल्या आचरणात कशी आणता येईल त्या करिता प्रयत्न करावे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश राजुरकर यांनी केले.

या प्रसंगी उपस्थितांनी बचत गट सक्षम करण्यावर भर देत गावातील महिला आणि युवतींना व तरुण युवकांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेले भांडवल आणि व्यवसाय निवडीकरीता मार्गदर्शन केले. महिला बचतगटाच्या महिला सामुहीक उद्योग करून किती उत्पन्न घेऊ शकतात व त्यासाठी किती भांडवल भरावे लागते याचे तंतोतंत आर्थीक गणित सांगतांना रमेश राजुरकर यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीचे गमक समजावुन सांगितले. यावेळी महिलांना ग्रामीण भागात नैसर्गिकरित्या कमी खर्चात मोठी आर्थिक उलाढाल कशी करता येईल व त्यासाठी कोणता उद्योग महिला करू शकतात या बद्दल वस्तु बनवुन त्या बाजारपेठेत विक्री करण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले.

देशाची आर्थिक घडी जशी औद्योगिक क्रांती आणुन बनविता येते. तशीच ग्रामीन भागात महिलांना छोटे छोटे उद्योग देउन जर आत्मनिर्भर केले तर खेड्यात नविन आर्थिक क्रांती घडू शकते. आणि त्यामुळेच ग्रामीन भागातील महिलांना आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण देउन त्यांना उद्योगी बनवून व खेड्यात नविन आर्थिक क्रांती आणू अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश राजुरकर यांनी गुरुदेव सेवा मंडळ पिरली येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमा मध्ये सर्व गावकऱ्यांना दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment