भद्रावती तालुका प्रतिनिधी :-आदिवासी माना जमात संघटन चंदनखेडा च्या वतिने राजमाता माॅ मानिका मुर्ती ची समाजातील युवकांच्या बसहकार्याने काल दिनांक 15 फेब्रुवारी २०२२ ला सायंकाळी 6 वाजता राजमाता क्लब ग्राउंड वरुन राजमाता माॅ माणिकेची शोभायात्रा गावांमधून ठोल,ताशाच्या, गजरात जयघोषात शोभायात्रा संपन्न झाली व राजमाता माॅ मानिका पेनठाणा येथे प्रेरणास्थान राजमाता माॅ मानिका ईची स्थापना मुठपुजा, खण मांडुन, जयघोषात करण्यात आली . सर्व समाज बांधवांनी,महीलांनी,युवा वर्गानी, युवतींनी, बाल गोपालांनी या शोभायात्रेत प्रत्यक्ष सहभागी होवून व राजमाता माॅ मानिकेच्या स्थापनेला प्रामुख्याने उपस्थित राहुन क्रार्यक्रमाची शोभा वाढविली क्रार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.यावेळी समस्त गावकरी उपस्थित होते.अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Home
chandrapur
चंदनखेडा येथे माँ मणिका देवीची शोभायात्रा व राजमाता माँ माणिका देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment