वेकोली कोळसा खाणीच्या परिसरात मागील बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. त्याच परिसरातील सेक्टर 2 मध्ये असलेल्या एका खड्ड्यातील पाणी बाहेर काढण्याकरिता तिथे मोटर पंप लावलेल्या खड्यात आज सकाळी पहाटेच्या सुमारास अंधारात बिबट्याचा खड्ड्यात पळून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वेकोली कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन लविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मृतब बिबट्याला खड्ड्या बाहेर काढले. त्यानंतर ट्रान्सीट ट्रान्समिट सेंटर येथे डॉ. कुंदन कोडसेलकर यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.
यावेळी वन विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काटेकर इको प्रो अध्यक्ष बंडू धोतरे, मुकेश भांदककर आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment