भद्रावती :-2014 पासून सर्व लोकप्रतिनीधी रोड रुंदीकरण करण्यासाठी तसेच हा रोड दोन
जिल्हयाला जोडणारा असल्यामुळे रस्ता राज्य महामार्गत रूपांतर करण्यासाठी मागणी केली होती. तसेच वर्धा नदीवर सुध्दा पुल व्हावी अशी सुध्दा मागणी केली असता माना. नितीनजी गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून कोटयावधी रूपये खर्च करून पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. चंद्रपूर ते यवतमाळ या दोन जिल्हयाला जोडणारा रस्ता अजुन पर्यंत राज्यमहामार्गात रूपांतर न झाल्यामुळे वर्धा नदीवर बांधलेले भव्य दिव्य पुल हा कुचकामी असल्याचा आरोप माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केला आहे.
सन 2014 पासून नागपूर चंदपूर हायवेपासून सुमठाणा मिरादेवी डोरवासा- तेलवासा विपरी हे गांव 1500 लोकसंख्येच्या वरील गावे आहेत. शासनाच्या नियमा मध्ये बसणारे गावे असल्यामुळे तत्कालीन केन्द्रीय मंत्री मा. हंसराजभैय्या अहिर, भारत सरकार व तत्कालीन वित्त नियोजन बने मंत्री महाराष्ट्र शासन मा. सुधिरमाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन आम्ही केलेल्या पत्रव्यवहारातुन जो काही पाठपुराना झाला त्या अनुषंगाने बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातुन ज्याकाही त्रुटी व अडचणी निर्माण होत्या त्या सुध्दा पुर्ण करून शासनाला प्रस्ताव दिलेला आहे.
मागील काही दिवसापासून करोडो रूपये खर्च करून वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले परंतु रस्त्याचे रूंदीकरण करून या रस्त्याला राज्य महामार्गात रूपांतर करावे अशी मागणी माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केली होती. ही मागणी करीत असतांनी स्वतः जि. प. सदस्य निधी अंतर्गत 25 लाखाचा निधी खर्च करून सुमठाणा - तेलवासा रोड ला फेर डांबरीकरण करून रोडची दुरुस्ती केली होती पण मागील सन 2018 पासुन या रस्त्याच्या संदर्भात कोणत्याही लोकप्रतिनीधींनी पत्रव्यवहार केला नसल्याने सुमठाणा ते तेलवासा व जुनाडा से वणी रोडच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी जैसे थे पडलेला आहे. वरील रस्ता हा जिल्हा परिषदे कडे असला तरी दि. 22/12/2017 रोजी झालेल्या सर्व साधारण सभेतील ठराव क्र. 10 (37) अन्वये रस्ता महामार्गामध्ये दजन्नती करीता "रस्ते लांबी रस्ते विकास आराखडा, सन 2001 2021" मध्ये जि.प. बांधकाम विभाग चंद्रपूर यांनी मंजुरी देवुन सार्वजनीक बांधकाम विभाग चंद्रपूर कडे प्रस्ताव सादर केला होता.
या रस्त्यावरती जे काही अधिराज्य आयुध निर्माणी चांदा थे आहे, ते लोकांच्या मनात चुकीचा संचम निर्माण करणारा आहे. सुमठाणा तेलवासा रोड, हा जिल्हा परिषदेच्याअधिपत्याखाली असल्यामुळे या रोडची जी 36 मिटर रूंदी आहे ते सोडून आयुध निर्माणी चांदा हे आपले कार्य करू शकते. या रोडच्या बाजुला नगर परिषद मद्रावतीची वसाहत असल्यामुळे नगर परिषद भद्रावतीला लोक निर्माण कार्यासाठी अडचण येत आहे. तेव्हा ओ.एफ. चांदा यांनी सुध्दा आपली हद्द ओळखुन काही लोकनिर्माण कार्यास अडचणी निर्माण करू नये असे सुध्दा एका पत्राद्वारे विजय वानखेडे यांनी कळविलेले आहे.
सन 2001 2021 रस्ते योजने मध्ये समाविष्ठ करणे, आखणीत बदल करणे, रस्ते दजन्नत करणे ई. बाबत (तालुका मदावती, जि. चंद्रपूर मार्ग सुमठाणा ते तेलवासा इजीमा 23 चंद्रपूर जिल्हयातील भाग एकुण लांबी 10.20 किमी तसेच उर्वरीत 14.80 कि.मी. लांबी या रस्त्याला जोडणारा जुनाडा ते वणी प्रजीमा 73 ची लांबी यवतमाळ जिल्हयात येते. या रस्त्यामधील दोन्ही जिल्हयाला जोडणान्या वर्धा नदीवर पुर्णत्वास आलेल्या पुलामुळे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग पुर्णत्वास यायला पाहिजे होता मग ते सुध्दा काम पुर्ण झाले नाही. असा आरोप विजय वानखेडे यांनी केला आहे.
वरील रस्ता दर्जोन्नत करण्याकरिता शासन परिपत्रक क्र. संकीर्ण 2014/प्र.क्र. 65 / नियोजन 2 मंत्रालय, मुंबई दिनांक 20/07/2016 नुसार केलेल्या वैशिष्टाची पुर्तता सुध्दा पुर्ण केली आहे. सदर रस्ते लांबी रस्ते विकास आराखडा सन 2021 मध्ये दर्जोन्नत करण्याबाबत
जि. प. चंद्रपूर यांनी परीपुर्ण ठराव घेतला आहे. सन 2001 च्या जनगणनेनुसार 1500 व त्या व्यतिरिक्त लोकसंख्येचे गांव या रस्त्यावर येत असल्या कारणाने दर्जोन्नत करिता प्रस्तावित रसत्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 1930, औद्योगीक पर्यटन, शेतीविषयक बाजारपेठ, शैक्षणिक व आरोग्य या मुलभुत सेवा उपलब्धी करिता सोयीचा होणार आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्हयांना जाण्यासाठी जवळच्या मार्ग होणार आहे. वरील रस्ते दर्जोन्नत झाल्यास चंद्रपूर जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीत 10.20 कि.मी. ने वाढ होणार आहे. असे सुध्दा जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी कळविले आहे.
तसेच वरील रस्त्याचे रूंदीकरण करण्यासंदर्भात आपण आपल्या स्तरावरून योग्य ते पाउल उचलावे व येणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक बजेट अधिवेशनात या रस्त्याकरिता बजेट मध्ये निधीची तरतुद करावी. महाराष्ट्र शासन नियोजन 2 मंत्रालय, मुंबई यांनी नमुद केलेल्या वैशिटयाची पुर्तता केल्या नंतरही हा राज्य मार्ग रस्ते मध्ये समाविष्ट होत नसेल तर भारतीय जनता पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा गंभीर ईशारा देवुन समंधीत यंत्रणा याला जबाबदार राहणार आहे. अशी चेतावणी सुध्दा माजी जि. प. सदस्य विजय वानखेडे यांनी कळविले आहे. या संदर्भात मा. अप्पर सचिव (नियोजन) बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई व स्थानीक लोकप्रतिनीधींना सुध्दा या पत्रान्वये कळविलेले आहे.
0 comments:
Post a Comment