Ads

22 मार्च "जलसंपदा दिना "पासून इरईचे खोलीकरणास सुरवात करा अन्यथा, जलसंपदा दिनी जलसत्याग्रह -इरई बचाव

चंद्रपुर :-
इरई नदी चंद्रपूरकरांची जीवनदाईंनी आहे. या नदीचे जतन प्रशासन करू न शकल्यामुळे 5 ते 9 ऑगस्ट 2006 व सन 2013 ला 5 लहान पूर व 2 ऑगस्ट रोजी महापूर येऊन जीवित व वित्त हानी सोबत अनेक संकटाचा सामना अर्ध्या चंद्रपूरकरांना करावा लागला.या दोन्ही महापुराच्या पूर्वी इरई बचाव जनआंदोलनाने पुराचे भाकीत करीत नदीच्या खोलीकरण -रुंदीकरण, बंधारे बांधण्याची मागणी केली होती. दि.16-12-2021 ला राज्याचे पर्यावरण मंत्री, जलसंपदा मंत्री, चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे जुनीच मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत दि.13 फेब्रुवारी 2022 ला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री विजय वाडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,सिंचन विभागाचे अधिकारी सोबत नदीची पाहणी केल्यानंतर प्रशासनास खोलीकरण -रुंदीकरणाचे आदेश दिले. दि 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे इरई नदी विकास आराखड्यावर चर्चा करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की इरई नदीचे खोलीकरण व संवर्धसाठी पालकमंत्री विजय वाडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठं थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थिती कश्यामुळे निर्माण होते या बाबींचा अंदाज येईल. त्यासाठी सर्वप्रथम नदीचा गाळ काढून खोलीकरण करणे आवश्यक आहे.या निर्णया मुळे इरई नदीचे रुपडे पालटण्याची आशा निर्माण झाली आहे. या बैठकीत पालकमंत्री विजय वाडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाचे व सिंचन विभागातील मोठे अधिकारी सहभागी झाले होते.जनहिताच्या या निर्णया बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री विजय वाडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा प्रशासन, जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख, महाविकास आघाडीतील पक्षांचे जिल्हा/महानगर अध्यक्ष,राजेंद्र वैद्य, रामू तिवारी, संदीप गिऱ्हे,यंग चांदा ब्रिगेड व सहकार्य करणाऱ्यांचे जनआंदोलन आभारी आहे. सन 2015 ला सिंचन विभागाने तयार केलेल्या आराखड्या नुसार दाताला पूल ते हडस्ती गाव जिथं इरई वर्धा नदीला मिळते तिथं पर्यन्त हे खोलीकरण-90 मिटर(300फूट) रुंदीकरणाचे कामाला 22 मार्च जलसंपदा दीना पर्यंत सुरुवात करण्यास अडचण नाही कारण 2015 साली वेकोली व विज केंद्रातर्फे' इरई पुनुररूजीवन 'नावाने मिळालेले 6 कोटी रुपयातून खरीदी केलेल्या 9 जेसिपी व सिंचन विभागाचे पोकलंड मशीन,वाचलेली 39 लाखाची राशी लेबर, डिझेल साठी सध्या वापरात आणता येईल.अन्यथा दि 16-12-2021 च्या निवेदनाच्या व पूर्व सुचनेच्या अनुषंगाने "जलसंपदा दिन 22 मार्च 2022 " मंगळवार ला दाताला पूल नदी पात्रात इरई कन्या -पुत्र जल सत्याग्रह करतील. प्रशासनाने जलसंपदा दिनी कामाला सुरवात करण्याची विनंती जनआंदोलनाने केली आहे.
( इरई नदीचे खोलीकरण व 90मिटर (300 फूट )रुंदीकरण झाल्यास महापूर येणार नाही. भुगर्भात, विहिरी, बोरिंग मध्ये पानी झिरपून उन्हाळ्यात महानगर व लगतच्या गावात पानी टंचाई निर्माण होणार नाही,नविन पूर रेषा ( blue line) हटविन्याची- रद्द करण्याची मागणी रेटून धरता येईल.महानगरातील अकृषक, परावर्तीत प्लॉट जे पूर रेषेच्या आत आहे त्या प्लॉट धारकांना घराचे बांधकाम करण्याची अधिकृत परवानगी मिळेल.सन 2018 व 31 मार्च 2021 पर्यन्त व पुढेही गुंठेवारी करिता चंद्रपूर मनपा कडे
प्लॉट व तयार घराचे नकाशे जमा करणाऱ्या लोकांचे अधिकृत व हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल-कुशाब कायरकर. संयोजक, इरई बचाव जनआंदोलन व संस्थापक -वृक्षाई )
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment