Ads

देवटोक येथे सामाजिक सभागृहाचे व रस्त्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भूमिपूजन

सवाली :-सावली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावरील या तीर्थस्थानी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या क्षेत्राचे आमदार, नामदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते 35 लक्ष रुपयाचे सामाजिक सभागृहाचे व रस्त्यासाठी 60 लक्ष रुपयांच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष परम पूज्य संत मुरलीधर महाराज उपस्तीत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे युवा नेते दिनेश चिटनूरवार,तर प्रमुख पाहुणे म्हणून सावलीचा नगराध्यक्षा लता लाकडे, साखरी चे सरपंच गेडाम उपसरपंच दादाजी किन्हेकार, जीबगाव सरपंच पुरुषोत्तम चुधरी, कांग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहणे ,राकेश गड्डमवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिवाकर भांडेकर,पतरु पाटील चुधरी,नप उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार, नगरसेवक विजय मूत्यालवार,प्रफुल वाळके,प्रीतम गेडाम त्याचप्रमाणे इतर मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.


रस्त्यासाठी 60 लक्ष रुपयाचे रस्त्याचे खडीकरण चे भूमिपूजन व सामाजिक सभागृहासाठी 35 लक्ष रुपयांचे भूमिपूजन आज पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिलेला शब्द पाळला यामुळे या वेळी श्री पुण्यभूमी देवस्थान खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचे आभार मान्यण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमपूज्य संत मुरलीधर महाराज तर संचालन सुरेंद्र उरकुडे, आभार सुनील बोमनवार यांनी मानले.यावेळी श्री पुण्यभूमी मुरकुंडेश्वर ट्रस्ट चे सचिव नरेश जक्कुलवार,गुणाजी ठोंबरे,नामदेव हजारे,सूरज बोम्मावार, भास्कर पोवनवार,राकेश गोलेपल्लीवार, प्रतीक संगीळवार,निलखंठ फाले,कवेशर पुल्लीवार,यांच्या सह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment