Ads

अज्ञात चोराने घराचा दरवाज्याचे कुलूप तोडुन लंपास केले 49 हजाराचे दागिने

भद्रावती प्रतिनिधी :-दि.26/03/2022 ला शालीक मारोती डुडुरे वय 58 वर्ष धंदा-मजुरी रा. भोजवार्ड भद्रावती ता. भद्रावती जि. चंद्रपूर यांनी पोलीस स्टेशनला हजर येउन तोडी रिपोर्ट दिली, की ते वरील ठिकानी पत्नी व दोन मुलीसह राहत असुन तथा ऑडनॉन्स फॅक्टरी चांदा येथे ठेकेदारीत मजुरीने काम करतो तसेच भद्रावती तालुका नागरी पथ संस्थेमध्ये डेली कलेक्शनचे आरडीचे काम करतो. त्यांच्या पत्नी नामे सौ. माला हिवे यांचे घरी एका रुममध्ये ब्युटी पार्लर चालवितात. त्यानच्या दोन्ही मुली बाहेर नौकरी करत असल्याने माझी पत्नी व मिच घरी राहत असतो.
काल दिनांक 25/03/2022 रोजी पत्नी दुपारी 2-00 या सुमारास बाहेर गावला गेली असता ते आरडी कलेक्शनचे काम करून नाईट ड्युटी असल्याने रात्री 8/30 वा.घराचे दरवाज्याला कुलुप लावुन ड्युटीवर गेले. दिनांक 26/03/2022 रोजी नाईट ड्यूटी करुन सकाळी 7/00 वा घरी परत आले असता त्यांना घरांचे दरवाज्याला लावलेले कुलूप तुटून दिसले दरवाज्याला कळी कोंडा लावून होता त्यांनी दरवाजा उघडुन आत मध्ये जावुन पाहिले असता बेडरूम मधिल एक लोखंडी कपाट व लाकडी कपाट अशा दोन्ही कपाटातील कपडे व इतर साहीत्य दिवानांवर तसेच खाली अस्त व्यस्त पडलेले दिसले . लोखंडी कपाटात साडी खाली ठेवुन असेल आरडी कलेक्शनचे 7000/- रुपये दिसले नाही. तसाच पत्नीला फोन करून तिचे काही कपाटात ठेवून असलेले दागीने वगैरे गेले काय म्हणून विचारले असता पत्नी दुपारी 4×00 वा. घरी आल्यानंतर चौकशी करून सांगीतले की, अंदाजे तिन वर्षांपूर्वी घेतलेले सोण्याचे 1) कानातील सुईधागा मोड अंदाजे 4 किंमत 16000/- रू 2) गळ्यातील लाकेट ज्यावर इंग्रजीमध्ये guddi लिहलेले 4 ग्रॅम वजनाचे 18000/- रुपये 3) नाकातील मुकरा लाल खडा असलेला 1 ग्रॅम वजनाचा किंमत 4000/- रुपये 4) गळ्यातील लहान मुलाची जिवली 1 ग्रॅम 4000/- रुपये "किंमतीचे सोन्याचे दागीने प्लॉस्टीक डब्बी मधील लोखडी कपाटात ठेवून असलेली डब्बीतून काढत कोणीतरी घेवुन गेल्याचे पत्नीने सांगीतले. दिनांक 25/03/2022 रोजी रात्री आम्ही कोनीही घरी हजर नसताना कोनीतरी अज्ञात चोराने घराचा दरवाज्याचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करता लोखडी कपाटातून नगदी 7000/- रुप सोण्याचे दागाने किंमत 42000/- असा एकूम 49,000/- रु चा माल अज्ञात चोराने चोरून नेल्याने पोस्टेला कार्यवाहीसाठी तक्रार दाखल केली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment