Ads

24 तासात शहरातील पाणी पुरवठा सुरू करा अन्यथा मनपाला कुलुप ठोकू - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :-मागील 6 दिवसापासून शहरातील पाणी पुरवठा ठप्पwater supply stoppedआहे. त्यामुळे नागरिकांना तपत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. फुटलेल्या पाईपलाईनचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून. सदर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून 24 तासात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा महानगरपालिकेला टाळे ठोकू असा इशाराच आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.
Start water supply in the city within 24 hours, otherwise the Municipal Corporation will be locked up. Kishor Jorgewar
आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी इरई धरण येथे सूरु असलेल्या पाईप लाईन दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी संथ गतीने सुरू पाईप दुरुस्तीच्या कामाबाबत त्यांनी संतापही व्यक्त केला.
यावेळी मनपा उपायुक्त अशोक गराटे, मनपा अभियंता जोगी, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते पंकज गुप्ता, अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, सविता दंडारे, विमल काटकर, राम जंगम, विलास वनकर, राशेद हुसेन, नकुल वासमवार, भाग्यश्री हांडे, आदींची उपस्थिती होती.
शहरातील पाणी पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. दर उन्हाळ्यात चंद्रपूर शहरात उद्भवनाऱ्या या परिस्थितीला मनपा प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार आहे. असा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी इरई धरणाच्या फुटलेल्या पाईप लाईनच्या कामाची पाहणी केली. यावेळी सदर काम कासव गतीने सुरू असल्याचे लक्षात येताच आ. जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. नागरिकांची भर उन्हात पाण्यासाठी लाईलाई होत असतांना मनपा प्रशासन इतके सुस्त असणे हे योग्य नाही. अशा शब्दात यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रोष व्यक्त केला. जेसीबी मशीन वाढवा, मनुष्यबळ वाढवा, युद्ध पातळीवर काम करा अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. तसेच 24 तासात पाणी पूरवठा सुरू न झाल्यास महानगर पालिकेला कुलूप ठोकण्याचा इशाराही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment