Ads

स्वतंत्र "आदिवासी" रेजिमेंट तयार

चंद्रपूर : भारतीय सैन्यात अशा अनेक रेजिमेंट आहेत, ज्यांची नावे काही समुदाय, उप-समुदायांवर आहेत जसे की शीख रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, जाट रेजिमेंट, मराठा रेजिमेंट त्याच धर्तीवर आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र "आदिवासी" रेजिमेंट तयार करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली आहे.
देशातील मूळ निवासी हा आदिवासी समुदाय आहे. आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र "आदिवासी" रेजिमेंट केल्यास आदिवासी समाजाचा आदर होईल आणि अधिकाधिक आदिवासी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.

त्याच प्रमाणे आपल्या देशातील आदिवासी लोकसंख्या परंपरेने मागासलेली आणि उपेक्षित राहिली आहे. बहुसंख्य समाजाकडून नेहमीच अत्याचार आणि अपमान होत आले आहेत. या संदर्भात, आदिवासी लोकांसाठी काही शब्द वापरले जातात जे अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह आहेत. आदिवासी लोकांना 'वनवासी' आणि 'गिरिजन' असे इतर शब्द वापरणे हे या समुदायांसाठी अपमानास्पद आहे. त्यांना 'आदिवासी' म्हटले पाहिजे. कारण ते या भूमीचे मूळ रहिवासी आहेत. अनुसूचित जातीच्या लोकांसाठी 'हरिजन' हा शब्द वापरण्यावर ज्याप्रमाणे बंदी घालण्यात आली आहे, त्याप्रमाणे आदिवासींसाठी अशा अपमानास्पद शब्दांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी सरकारने कायदेशीर पावले उचलली पाहिजेत. अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment