तालुका प्रतिनिधी( भद्रावती):- भद्रावती मांजरी मार्गावरील माजरी गावाजवळील 31 क्रमांकाचे रेल्वे गेट सतत बंद राहत असल्यामुळे वेकोली कामगार, माजरी येथील नागरिक तथा या मार्गावरून वाहतूक करणारे इतर नागरिक त्रस्त झाले आहे. हा सततचा होणारा त्रास यावर काहीतरी उपाययोजना करून बंद करावा व कामगार तथा नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी वेकोलि माजरी येथील राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघटनेद्वारे माजरी येथील रेल्वे स्टेशन अधीक्षकाना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर रेल्वे गेटवे दिवसातून अनेकदा बंद असते एक-एक तास बंद अवस्थेत असल्यामुळे माजरी वेकोली शेत्रातील कोळसा खाणीतील कामगारांसाठी हे गेट फार मोठी डोकेदुखी ठरली आहे. या परिसरातून जवळपास 800 वेकोली कामगार या मार्गाने आपापल्या कामावर येत असतात मात्र गेट बंद राहत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो याशिवाय मांजरी -पाटाळा या गावातील नागरिकांना याच गेट वरून भद्रावती येथे दररोज अनेक कामानिमित्त यावे लागते. एखाद्यावेळेस वैद्यकीय इमर्जन्सी निर्माण झाल्यास त्यांना या बंद नेटचा सामना करावा लागतो परिणामी रुग्णांना त्वरित इलाज न मिळुन तो दगावण्याचा धोकाही नाकारता येत नाही .हाच मार्ग पुढे वनी शहराकडे जात असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो ही गंभीर समस्या लक्षात घेता तात्काळ याचे निराकरण करावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ इंटकचे माजरी क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांच्या नेतृत्वात रेल्वे अधीक्षकांना देण्यात आले .यावेळी सघटनेचे अध्यक्ष धनंजय गुंडावार ,सचिव परमानंद चौबे, दिलीप पारखी, देवानंद पिंपळकर, अनिल् सिह, आदींची उपस्थिती होती. सदर निवेदनाच्या प्रतीलीपी चंद्रपूर- वनी- आणी क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर व डीआरएम सेंट्रल रेल्वे नागपूर यांना पाठविण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment