Ads

भारतीय स्टेट बँक बनावट आयकर रिटर्न प्रकरणात आणखी 8 आरोपींना


चंद्रपूर :- बनावट आयकर रिटर्न बनवीत State Bank of India ला तब्बल 14 कोटींचा चुना Fraud लावल्या प्रकरणी बँक अधिकारी सहित 15 कर्जदारांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

या प्रकरणी पुन्हा नव्या 8 आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे, आता एकूण आरोपींची संख्या 23 झाली आहे. Home loan साठी बँकेकडे बनावट Income Tax Return सादर करीत 40 ते 50 लाखांच्या घरात बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज मंजूर केले. मात्र या संपूर्ण कर्ज loan प्रकरणात नियमानुसार कागदपत्रे तपासण्यात आली नाही, सदर बाबीची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी कांग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी सदर प्रकरण उचलत या संबंधी देशाच्या अर्थ मंत्री finance minister निर्मला सीतारामन यांच्याकडे तक्रार करीत CBI चौकशीची मागणी केली होती. कक्कड यांच्या आरोपाची स्टेट बँकेने दखल घेत तपास केला असता बँकेला तब्बल 14 कोटींचा चुना लावण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली. यानंतर स्वतः बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 2 वर्षानी या प्रकरणात 15 जणांना अटक करण्यात आली असून पुन्हा 8 नवे आरोपी यामध्ये अडकले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एकूण आरोपींची संख्या 23 झाली आहे. या सर्व आरोपींना 6 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ज्यामध्ये रामप्रवेश नगिनासिंग यादव (कामगार चौक चंद्रपूर), प्रकाश डोमाजी जुमडे, चंद्रपूर. सौ. निलीमा प्रकाश जुमडे चांदणी नगर वार्ड नं. ६ घुग्घुस, माया सुरेश काशेटटीवार, (आझाद वार्ड राजुरा), बंडु सदाशिव भगत राजुरा, आशिष बंडुजी भगत वय ( चुनाळा ), बंडु मधुकरराव लांडगे. सौ. शिला बंडुजी भद्रावती) अशी ही नावे आहेत.या फसवणूक प्रकणात एका नामांकित बिल्डर कंपनीत भागीदार असलेल्या आयकर सल्लागार दाम्पत्याचा वारंवार उल्लेख येत आहे. ही बनावट कागदपत्रे त्यांनीच तयार केलेली असावी असा कयास आहे.
या आठ आरोपींमध्ये एक जण बनावट आयकर तयार करून देणारा युवक आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. सर्व आरोपी सध्या दुर्गापूर पोलीस ठाणे परिसरातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. त्यांना ५० हजार ते एक लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले होते, त्यांच्याकडून फक्त आधार कार्ड घेतल्या गेले होते. आरोपी रैयतवारी कॉलरी व घुग्घुस परिसरातील आहेत.
 या प्रकरणामूळे चंद्रपुरातील बिल्डर्स लॉबीत चांगलीच खळबळ उडाली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment