चंद्रपुर :-महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री आ.देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावला.या नोटिशीची रविवारी 13 मार्चला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी होळी केली.आता तर फक्त नोटीस जळाला पण पुढे या सरकारची बेईमानी राख होऊन सत्य,धर्म आणि विकासाचाच विजय होईल,असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष,माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी गांधी चौक येथे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारच्या वतीने मुंबई पोलिसांनीं बजावलेल्या नोटिशीची होळी करतांना व पत्रकारांशी संवाद साधतांना केले.
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर,भाजपा जिल्हाध्यक्ष (श)डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,भाजपा जेष्टनेते प्रमोद कडू,तुषार सोम,रामपालसिंह,राजीव गोलीवार,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,मंडळ प्रमुख रवी लोणकर,विठ्ठलराव डुकरे,दिनकर सोमलकर,सचिन कोतपल्लीवार,प्रदीप किरमे,महिला मोर्चा नेते अंजली घोटेकर, प्रज्ञा बोरगमवार,मंजुश्री कासनगोट्टूवार,किरण बुटले,डॉ भरती दुधानी,युवा नेते विशाल निंबाळकर,प्रज्वलंत कडू,सूरज पेदुलवार,सुनील डोंगरे,नगरसेवक संदीप आवारी, रवी आसवानी,सविता कांबळे,प्रशांत चौधरी,रुद्रनारायण तिवारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ.मुनगंटीवार म्हणाले,4 राज्यातील जनतेने सत्तेसाठी राजकारण करणाऱ्यानां नुकताच धडा शिकवला.भाजपाला नेत्रदीपक यश मिळाले म्हणून,विरोधीपक्ष नेते आ फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आला.आ.फडणवीस यांनी पुराव्यानिशी भ्रष्टाचार उघडकीस आणला.परंतु त्यांना त्रास दिला जात आहे.पुरावा देणाऱ्याला त्रास देणे,ही देशातील पहिलीच घटना आहे.फडणवीस यांनी उचललेला विषय,विधानसभेच्या नियम पुस्तिकेनुसार योग्य आहे.दुर्योधन-दृश्यासन सारखे हे सरकार वागत आहे.बेईमानीच्या आधारावरच महाआघाडी सरकार सत्तेचा दुरुपयोग करून,विरोधी पक्षाला संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत,असे ते म्हणाले.सूड घेण्याच्या या प्रयत्नाच्या विरोधात हे जनतेचे आंदोलन व कार्यकर्त्यांचा आक्रोश असल्याचे ते म्हणाले.यावेळी आ.मुनगंटीवार यांच्या समवेत अनेकांनी त्या नोटिशीची होळी करीत,महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.यावेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
यावेळी देवानंद वाढई, अनिल फुलझेले, संजय कंचर्लावार,जयश्री जुमडे, सोपान वायकर, वंदना तिखे, संगीता खांडेकर, शिला चव्हाण, वंदना जांभुळकर, शितल गुरनुले, पुष्पा उराडे, चंद्रकला सोयाम, माया उईके, वनिता डुकरे, राहुल घोटेकर,राजेंद्र खांडेकर, अरूण तिखे, डॉ. दीपक भटटाचार्य, धनराज कोवे, विनोद शेरकी,सूर्यकांत कुचनवार,प्रभा गुडधे,वंदना संतोषवार, ऍड. हरीश मंचलवार, ऍड. सुरेश तालेवार,सुनिल डोंगरे, प्रमोद क्षिरसागर, यश बांगडे, कुणाल गुंडावार, आकाश मस्के, राजेश यादव, मयुर चव्हाण, सतिश तायडे, सत्यम गाणार, अक्षय शेंडे, संजय पटले, गणेश रामगुंडेवार, प्रविण उरकुडे, मनिष पिपरे, राजेश बोमनवार, सिंधु राजगुरे, प्रभा गुळधे, रेणु घोडेस्वार, माया मांदाडे, रामजी हरणे, संदीप देशपांडे, प्रमोद शास्त्रकार, मनोरंजन रॉय, राजू जोशी, पप्पु बोपचे, सय्यद चॉंद पाशा,विजय राऊत,राहुल घोटेकर,विनय कावडकर,पूनम तिवारी,मोहन चौधरी,निलेश बेडेकर,अरुण रहांगडाले, दशरथ सोनकुसरे, मनीषा महातव,वर्षा सोमलकर,राजू घरोटे, नूतन मेश्राम,तेजा सिंग,आमीन शेख,बाळू कोलनकर,प्रशांत कोलप्याकवार,चंदन पाल, रामकुमार अक्केपल्लीवार,शुभम गेडाम,पवन ढवळे, अमोल नगराळे, यश बांगडे,भोलेनाथ सरकार,कविता सरकार,सिधु राजगुरे,अड. सारिका संदूरकर,ज्योती पोतले यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment