देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या चिंतेने केंद्र सरकारने दरवाढ रोखून धरली होती. मात्र, आता निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किमतीत पुन्हा दरवाढ करून जनेतेची आर्थिक लूट सुरू केली आहे. सीएनजी-पीएनजी गॅस तसेच खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झाले आहे. परंतु, केंद्र सरकारकडून महागाई कमी करण्यासाठी कोणतीच पाऊले उचलली जाताना दिसत नाही.
त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशात महागाईमुक्त भारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
शहरातील कस्तुरबा चौकातून सिलिंडर, दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मिलन चौक मार्गे यात्रेचा कस्तुरबा चौकात समारोप झाला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी टक्कल करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, माजी महापौर संगीताताई अमृतकर, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रताताई ठेमस्कर, चंद्रपूर ग्रामीण महिलाध्यक्ष चित्राताई डांगे, चंद्रपूर शहर महिलाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शिवा राव, माजी सभापती संतोष लहामगे, गोपाल अमृतकर, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश अड्डुर, युवक काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष शंतनु धोटे, युवा नेता सचिन कत्याल, युवक काँग्रेसचे महासचिव साईश वारजुरकर, रमिज शेख, विद्यार्थी काँग्रेस महासचिव कुणाल चहारे, शालिनीताई भगत, अनुताई दहेगावकर, राधिका बोरा, संदीप सिडाम, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, बापू अन्सारी, नगरसेवक सकिनाताई अन्सारी, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, नौशाद शेख, राजवीर यादव, पप्पूभाई सिद्दीकी, प्रसन्ना शिरवार, प्रीतीशा सहा, राजू वासेकर, स्वातीताई त्रिवेदी, राजेश त्रिवेदी, मनोज खांडेकर, काशीफ अली, मोनू रामटेके, केतन दुर्सेलवार, अशोक जंगम, राहुल चौधरी, सागर खोब्रागडे, भालचंद्र दानव, अखिल शेख, सूरज कन्नूर, राजू रेवल्लीवार, साबिर सिद्दीकी, अल्ताफ मामू, रोहित साव, हर्षा चांदेकर, वाणी दारला, सारिका ठोंबरे, रुपाली वाटेकर, सौरभ ठोंबरे, राजेश वर्मा, पूजा आहुजा, मिता तांबे, प्रज्ञा रामटेके, गुंजन येरमे, नागेश बंडेवार, अशपाक हुसेन, मोहन डोंगरे, आशुतोष वानखेडे, सविता मांडवकर, नेहा मिश्रा, रसिका वाघाडे, अशोक गड्डमवार, नितीन मंजिरे, लखन पराते, राजेश वर्मा यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
--
--
पेट्रोल, डिझेल, सिलिंडर, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत दरवाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची मालिका सुरू केली आहे. केंद्र सरकारने तातडीने देशातील महागाई कमी करून जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-रितेश (रामू) तिवारी,
जिल्हाध्यक्ष
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर
0 comments:
Post a Comment