Ads

देशव्यापी संपा निमित्त आयटक च्या नेतृत्वात जिल्हा धिकारी कार्यालय वर विशाल मोर्चा धडकला

चंद्रपूर /भद्रावती तालुका प्रतिनिधी:-  केंद्र आणि राज्य सरकार कडून कामगार विरोधी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करीत कामगार विरोधी कायदे रद्द करा.सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण थांबवा.योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन व शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या यासह विविध मागण्यासाठी 29 मार्च रोजी आयटक च्या नेतृत्वात हजारो योजना कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करीत आझाद बगीचा येथून दुपारी 1 वाजता चंद्रपूर जिल्हा कलेक्टर कार्यालय वर विशाल मोर्चा काढला व त्या नंतर जिल्हा धिकारी मार्फत मा.पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.स्थानिक समस्या बाबत मा.मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार व जनविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी आयटक सह ईतर केंद्रीय ट्रेड युनियन च्या नेतृत्वात देशभरातील कोट्यवधी संघटित , असघटित कामगार,योजना कर्मचारी,विविध कामगार संघटनांचे फेडरेशन ,शेतकरी व शेतमजूर यांनी 28 व 29 मार्च 2022 रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती.त्या अनुषंगाने चंद्रपूर येथे योजना कर्मचाऱ्यांनी विशाल मोर्चा काढून सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला.
केंद्र सरकारने संसदे मध्ये 44 कायदे रद्द करून त्या जागी मंजूर केलेल्या 4 श्रम सहिंता रद्द करा.कोणत्याही सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण करू नये,प्रचंड वाढलेली महागाई कमी करा. आशा वर्कर,गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका,मदतनीस व शालेय पोषण आहार कर्मचारी यांना किमान 26 हजार रुपये वेतन लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.योजना कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा .म्हातारपणी 60 वर्षा नंतर मासिक दहा हजार रुपये पेन्शन लागू करा.पेट्रोल, डिझेल व गॅस चे दर कमी करा.शेती मालाला किमान आधार भाव द्या.वीज विधेयक बील 2020 रद्द करा.शिक्षणाचे बाजारीकरण बंद करून मोफत व दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था करा.नवीन शैशनिक धोरण रद्द करा यासह विविध मागण्यां आंदोलना द्वारे करण्यात आल्या.
आंदोलनाचे नेतृत्व आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे,जिल्हा अधक्ष कॉ.दिलीप बर्गी,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रा.नामदेव कनाके, ड्रा.महेश कोपुलवा र,देवराव चवळे,कोल माईन संघटनेचे नेते कॉ.प्रदीप चीताडे, आयटक चे राजु गैन वार,प्रकाश रेड्डी,किसान सभेचे दादाराव ठाकरे, आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव ममता भिमटे,निकिता निर,सविता गटले वार,शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे वनिता कुं ठावार,श्रीधर वाढई,शंभाजी राय वाड,अंगणवाडी कर्मचारी संघटना चे रेखा रामटेके,एम.एस. ई. बि.वर्कर्स फेडरेशन चे उपाधक्ष कॉ.प्रकाश वानखेडे, कॉ.नागपुरे यांनी केले .मोर्च्यात जिल्हाभरातून हजारो योजना कर्मचारी सहभागी झाले होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment