Ads

अहो.... ऊर्जामंत्री राऊत साहेब इकडे लक्ष द्या.....

चंद्रपुर :-तुमच्या विभागाचा इतका मोठा प्रकल्प आम्ही आमच्या जिल्ह्यात चालवतो. आम्ही विज उत्पादन करुन तुम्हाला पैसे कमविण्याची संधी देता. मात्र तुम्ही आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे लक्षही देत नाही. अस कस होणार, अध्यक्ष महोदय त्यांना जरा सांगा... अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बोलतांना संताप व्यक्त केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. आज चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्ताचा विषय राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधी मध्ये उपस्थित केला. या लक्षवेधीवर बोलतांना चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत येथील प्रकल्पग्रस्तांबाबत सरकारने आपली भुमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. या प्रश्नावर बोलण्यासाठी अधिकचा वेळ देत चंद्रपुरातील सर्व लोकप्रतिनिधींना सदर विषयावर बोलण्याची संधी देण्याची मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अध्यक्ष महोदयांना केली. त्यांनतर भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विषयावर बोलत प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सभागृहात मांडला
चंद्रपूर थर्मल महाऔष्णिक विद्युत केंद्रांमध्ये प्रकल्प सुरु होऊन ४० वर्षे झाल्यानंतरही सिएसटीपीएस च्या आस्थापन विभागात कार्यरत असलेले अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या नावावर गैरप्रकल्पग्रस्तांची प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करीत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या नौकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ४० वर्ष उलटनूही ९९० प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नौक-या दिल्या गेलेल्या नाहीत. सिएसटीपीएसने नोटीस बोर्डवर लावलेल्या १२८ जनांच्या यादीत त्रुट्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे सदर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे का? आणि उर्वरीत प्रकल्पग्रस्तांबाबत प्रशासनाचे धोरण काय ? त्यांना कधी नौकरी देणार आहात? हे स्पष्ट करण्याची मागणी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. या थर्मल विद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास ३००० मेगावॉट विजेचे उत्पादन करत असतांना आम्हाला प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. प्रकल्पात शेतजमीनी गेलेल्या आमच्या शेतक-र्यांना येथे नौक-या मिळत नाही. आम्ही केवळ प्रदुषण सहन करायचे का असा प्रश्नही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थितीत केला. यावर उत्तर देतांना राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी १२८ उमेदवारांच्या तात्पुरता यादीस अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. सदर यादीची पडताळणी करण्याची कार्यवाही महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांच्या स्तरावर सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे नोकरीच्या मागणीसाठी सीएसटीपीएसच्या चिमणीवर चढलेल्या प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे बोलणे करून दिले होते, हा विषय सुटावा व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असून तसा पाठपुरावाही शासन स्तरावर त्यांच्या वतीने केला जात आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment